शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
2
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
3
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
4
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
5
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
6
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
7
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
8
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
9
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
10
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
11
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
12
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
13
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
14
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
15
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
16
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
17
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
18
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
19
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?

मेडिकल मिशन-गँबॉन...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 6:43 PM

२०१६ सालची ही गोष्ट. रोटरी इंटरकॉन्टीनेंटल मेडिकल मिशनसाठी गँबाँनला येणार का? डॉ. संजय देशपांडेंचा फोन आला आणि मग विचारचक्र ...

२०१६ सालची ही गोष्ट. रोटरी इंटरकॉन्टीनेंटल मेडिकल मिशनसाठी गँबाँनला येणार का? डॉ. संजय देशपांडेंचा फोन आला आणि मग विचारचक्र फिरायला लागले. कुठे आहे हा देश? विषयवृत्तावर असलेला. अ‍ॅटलांटिक समुद्राच्या किनाºयावर वसलेला. मध्य आफ्रिकेतला हा देश. दमट हवामान आणि भरपूर पाऊस. १९६० साली स्वतंत्र झालेल्या या देशावर मात्र पूर्णपणे फ्रेंच वसाहतीचा पगडा.

भाषासुद्धा फ्रेंच. इंग्लंडइतके आकारमान असलेल्या या देशाची लोकसंख्या मात्र फक्त अठरा लाख. ज्या शहरात जायचे होते ती या देशाची राजधानी लिब्रेव्हीले. या शहराची लोकसंख्या सात लाख. आफ्रिका खंडातला एक श्रीमंत देश. प्रामुख्याने सापडलेल्या तेल आणि खनिज साठ्यांमुळे आणि खूप कमी लोकसंख्या असल्यानेही. पण देशात दोनच वर्ग अतिशय श्रीमंत आणि अतिशय गरीब.

कदाचित या गरिबाची सेवा करण्याचे भाग्य आमच्या नशिबात असावे म्हणूनच रोटरी प्रांत ९१५० आणि ३०८० यांनी आयोजित केलेल्या या व्ही. टी. टी. (ग्लोबल ग्रांट कं. १७४६९६) व्होकेशन ट्रेनिंग टीममधील वीस डॉक्टर्स आणि आठ स्वयंसेवकांमध्ये आमचा समावेश करण्यात आला होता. या स्वयंसेवकामध्ये रोटरी इंटरनॅशनलचे माजी अध्यक्ष रोटे. राजा साबू, त्यांच्या सुविद्य पत्नी उषा साबू, पीडीजी रणजित भाटिया आणि पीडीजी मनप्रीत सिंघ अशा काही दिग्गजांचाही समावेश होता. आपल्या रोटरी प्रांत ३१३२ मधील एकूण सात डॉक्टरांनी या मिशनमध्ये भाग घेतला होता.

बाकी बहुतेक सर्व सदस्य हे प्रांत ३०८० मधील सिमला, चंदीगढ, पठाणकोट येथील होते. यात रोटे. डॉ. सचिन जम्मा- लॅप्रोस्कोपिक सर्जन, रोटे. डॉ. राहुल फासे- नेत्ररोग तज्ज्ञ, कराड, रोटे. डॉ. विनायक देशपांडे- नेत्ररोग तज्ज्ञ,  रोटे. डॉ. आसित चिडगुपकर- अस्थिविकार तज्ज्ञ, रोटे. डॉ. संजय देशपांडे- मूत्ररोग तज्ज्ञ, रोटे. डॉ. अंजली चिटणीस- स्त्रीरोग तज्ज्ञ,  रोटे. डॉ. सतीश जोशी- भूलतज्ज्ञ यांचा समावेश होता.

नुकताच सप्टेंबरमध्ये पंधरा दिवस सायबेरियन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, रशियाच्या दौºयावर जाऊन आलो असल्याने मी खरेतर विचारात पडलो होतो. पण मेडिकल मिशनमध्ये जाण्याची ही पहिली संधी. तेही लॅप्रोस्कोपिक सर्जन म्हणून ही बाबही मोहात पाडत होती. शेवटी त्या मोहाला बळी पडलो आणि निघालो. सोबत पीडीजी रोटे. डॉ. राजीव प्रधान यांनी दिलेल्या मोलाच्या टीप्स होत्या.२५ सप्टेंबर ते ५ आॅक्टोबर हे मिशनचे दहा दिवस. पण २३ सप्टेंबरला निघून सोलापूर, पुणे, दिल्ली आदीस अबाबा, कॅमेरून, लिब्रेव्हीले असा दमविणारा प्रवास झाला. विमानतळावरचे स्वागत मात्र जोरात झाले. रोटेरियन्स आणि रोटरॅक्टर्सचा सहभाग लक्षणीय.राजा साबूच्या उपस्थितीचा प्रभाव जाणवत होता. हॉटेलला मॅरेडियन रेंदामा अटलांटिक समुद्राच्या काठावर वसलेले सुंदर वास्तूशिल्प, तबियत खूश झाली. जेवणही उत्तम. शाकाहारी लोकांना थोड्या अडचणी आल्या परंतु डीजी रमणची पत्नी मीनूने बहुधा ट्रक भरून खाण्याचे पदार्थ बरोबर आणलेले असावेत. त्यामुळे वांदे झाले नाहीत.

मिशनचा पहिला दिवस तयारीतच गेला. चूल,चुआ, चुवो अशा तीन हॉस्पिटलमध्ये आमची विभागणी झाली.  चूल या हॉस्पिटलमध्ये माझी सुरुवात झाली ती मुळात स्टोअररुममध्ये जाऊन लॅप्रोस्कोपी सेट शोधण्यापासून. स्टोअरमध्ये गेलो आणि जणू अलिबाबाचा खजिनाच माझ्यापुढे उघडला गेला. लॅप्रोस्कोपीच्या साम्राज्यातले सर्वोत्कृष्ट असे स्टार्झ कंपनीचे स्पाईज मशिन माझ्यापुढे उभे होते. लागणारी सर्व शस्त्रे उपलब्ध होती. सुरुवात केली ती मशिन जोडण्यापासून. सर्व शस्त्रे निर्जंतुक करण्यापासून, सुदैवाने छान इंग्रजी बोलणारा आणि महत्त्वाचे म्हणजे लॅप्रोस्कोपी शिकण्यासाठी अतिशय उत्सुक असणारा सर्जन जोअ‍ेल माझ्याबरोबर होता. सरकारी हॉस्पिटलबद्दल काय सांगावे? अशा इमारतीमध्ये, या श्रीमंत देशातील जनता गरीब आहे म्हणून आम्हाला सर्जन म्हणून पाचारण करण्यात आलेले होते. असो. प्रत्यक्ष आॅपरेशन्सना दुसºया दिवशी सुरुवात झाली.  

सकाळी साडेआठ वाजता हॉटेलमधून निघून रात्री सात वाजता परत हॉटेलवर जायचो आम्ही. माझ्या साधारणपणे रोज दोन किंवा तीन सर्जरी होत असत. त्याला कारणेही तशीच असायची. सगळं काही नवीन. कोणालाही लॅप्रोस्कोपीमधले काहीही माहिती नाही. अगदी अ‍ॅसिस्टंटलाही. एका इन्स्टुमेंटचे नाव घेतले की दुसरेच हाती दिले जायचे आणि भाषेचा प्रचंड गोंधळ. रुग्ण उंचे-पुरे, बायका जाडजूड, शस्त्रक्रियाही तशा किचकटच. कधी फुटलेले अपेंडीक्स तर कधी फुटलेला अल्सर. खड्यासाठी पित्ताशय काढणे किंवा मोठे हार्निया दुर्बिणीने करणे, हे तिथल्या वातावरणात मोठे आव्हानच वाटायचे. आॅपरेशनसाठी सिस्टरने मदत करायची असते याची थोडीही कल्पना या लोकांना नव्हती. ट्रॉली लावणे, आॅपरेशनला मदत करणे, प्रत्यक्ष आॅपरेशन करणे ही सारी फक्त सर्जन्सची जबाबदारी. लिब्रेव्हीलेमध्ये पहिल्यांदाच लॅप्रोस्कोपी होत असल्याने बघ्यांची आणि फुकट सल्ले देणाºयांचीही गर्दी खूप. अगदी गँबाँन नॅशनल टीव्ही आणि गँबाँन नॅशनल रेडिओवर माझी छोटीशी मुलाखतही झाली.  सगळे फ्रेंच बोलणारे, इंग्रजीचा आनंदीआनंद पण डोळ्यांची भाषा प्रबळ होती. हावभावाने माणसे एकमेकांना समजून घ्यायचे. रुग्णांच्या आणि नातेवाईकांच्या चेहºयावरचा आनंद पाहून आम्ही कृतार्थ व्हायचो.-डॉ. सचिन जम्मा(लेखक लॅप्रोस्कोपी सर्जन आहेत)

टॅग्स :Solapurसोलापूरdocterडॉक्टरHealthआरोग्यMedicalवैद्यकीय