शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
4
SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
5
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
6
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
7
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
8
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
9
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
10
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
11
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
12
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
13
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
14
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
15
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
16
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
17
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
18
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
19
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
20
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरात पत्नीचा खून करणाºया पतीस जन्मठेप

By appasaheb.dilip.patil | Updated: August 1, 2017 17:51 IST

सोलापूर दि १ : पत्नीचा गळा दाबून खून केल्याच्या गुन्ह्याखाली आरोपी पती प्रभाकर यशवंत कलागते (वय ३५, रा. मजरेवाडी, सोलापूर) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांनी न्यायालयापुढे आलेले सबळ पुरावे ग्राह्य मानून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १ : पत्नीचा गळा दाबून खून केल्याच्या गुन्ह्याखाली आरोपी पती प्रभाकर यशवंत कलागते (वय ३५, रा. मजरेवाडी, सोलापूर) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांनी न्यायालयापुढे आलेले सबळ पुरावे ग्राह्य मानून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याशिवाय दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावला. शनिवारी या प्रकरणी झालेल्या सुनावणीत या प्रकरणातील सासू-सासºयास सबळ पुराव्याअभावी मुक्त करून मयत सुषमा कलागतेचा पती प्रभाकर यास याला दोषी धरले होते.
मयत सुषमाचा (वय २३, रा. मजरेवाडी, सोलापूर) विवाह प्रभाकर यशवंत कलागते याच्याशी १ जून २०१० रोजी झाला होता. विवाहानंतर सुषमास मूल होत नाही म्हणून सासू सुरेखा कलागते, सासरा यशवंत कलागते, पती प्रभाकर कलागते यांच्याकडून छळ होत असे. या काळात सुषमाला प्रतीक्षा नावाची मुलगी देखील झाली होती. यावरही आरोपींचा छळ सुरूच होता. ७ आॅक्टोबर २०१३ रोजी यातील आरोपींनी सुषमाशी भांडण करून तिचा गळा दाबून खून केला, अशा आशयाची फिर्याद मयताची आई राजश्री अरुण निस्ताने हिने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असता पोलिसांनी आरोपींविरुद्ध भा.दं. वि. ३०७, ३०२ सह ३४ अन्वये गुन्हा नोंदला होता.
---------------
सरकार पक्षाचा युक्तिवाद
या खटल्यात सरकार पक्षाकडून अ‍ॅड. प्रदीपसिंग राजपूत यांनी तर आरोपीकडून अ‍ॅड. प्रशांत देशमुख यांनी काम पाहिले.
या खटल्यात सरकारतर्फे ११ साक्षीदार तपासले. सरकार पक्षाने युक्तिवादात मयत सुषमा ही आरोपींच्या ताब्यात असताना मयत झाल्याने व उपलब्ध वैद्यकीय पुरावा आणि पंचनामा, परिस्थितीजन्य पुरावा, वैद्यकीय अधिकाºयांची साक्ष या बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. आरोपी प्रभाकर कलागते हा खुनाच्या आरोपाखाली दोषी असल्याने त्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. न्यायालयाने सुनावणीत न्यायालयापुढे आलेल्या साक्षीपुराव्याच्या आधारे आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर मयताची सासू सुरेखा व सासरा यशवंत कलागते यांना सबळ पुराव्याअभावी निर्दोष सोडले.
----------------
दंडाची रक्कम प्रतीक्षाला देण्याचा आदेश
आरोपी असलेल्या प्रभाकर कलागते याने पत्नीचा खून केल्याने त्यांना असलेली लहान मुलगी प्रतीक्षा आई मयत झाल्याने आणि पिता शिक्षेस पात्र ठरल्याने अनाथ झाली आहे. तिच्या पालनपोषणाच्या दृष्टीने पाच लाख रुपयांची मागणी सरकारी वकील अ‍ॅड. प्रदीपसिंग राजपूत यांनी केली. न्यायालयाने याची दखल घेत आरोपीला दोन लाख रुपयांचा दंड सुनावला. संबंधित रक्कम प्रतीक्षास देण्याचा आदेश दिला. तोपर्यंत संबंधित रक्कम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडे ठेवण्याचे निर्देश निकालाद्वारे न्यायालयाने दिले.