शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

आषाढीसाठी शासकीय यंत्रणा हायटेक

By admin | Updated: June 25, 2014 01:49 IST

प्रथमच होणार वॉकीटॉकीचा वापर

जगन्नाथ हुक्केरी ल्ल पंढरपूरआराध्य दैवत असणाऱ्या कानड्या विठुरायाची आषाढी यात्रा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. पंढरपूर तालुक्यात पालख्यांनी प्रवेश केल्यानंतर कोणतीही अडचण भासू नये, यासाठी प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली आहे. तर यावर्षी प्रथमच पंचायत समितीची यंत्रणा हायटेक करण्यात आली असून, वॉकीटॉकीच्या माध्यमातून भाविकांना सोयीसुविधा पुरविण्यात येणार आहेत.आषाढी यात्रेसाठी दहा ते बारा लाख भाविक पंढरीत दाखल होतात. याचबरोबर पालखी मुक्कामाच्या ठिकाणी स्थानिक नागरिक पालखीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. यामुळे मोबाईल नेटवर्क बंद पडत असल्याने संपर्क तुटतो. यामुळे यावर्षी दहा वॉकीटॉकीच्या मदतीने पालखी मुक्कामाच्या ठिकाणी भाविकांना पाणी, वीज, औषधोपचार या सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी ईशाधीन शेळकंदे यांनी सांगितले.सध्या पालखीबरोबर पिण्याच्या पाण्याचे ६५ शासकीय तर ४०० दिंड्यांचे टॅँकर आहेत. यासाठी सात ठिकाणी टॅँकर भरण्याची सोय केली आहे. याचबरोबर टॅँकरसोबत स्थानिक कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे, तर ८०३ पाण्याचे स्रोत राखीव ठेवले आहेत. याचबरोबर कॅनॉलला पाणी सोडण्याबाबत नीरा उजवा कालवा विभागाला पत्रव्यवहार केला आहे. पालखी तळावर टॅँकर उभे करण्याच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.तालुक्यात १७ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी १ कोटी ६६ लाखांची मागणी करण्यात आली आहे. तालुक्यात यात्रा कालावधीत २६ औषधोपचार केंदे्र स्थापन करण्यात येणार आहेत. यात प्रत्येक केंद्रात एक वैद्यकीय अधिकारी, दोन आरोग्य सेविका, एक शिपाई नियुक्त करण्यात येणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला काटेरी झुडपे तोडून स्वच्छता करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. --------------------------जादा कर्मचारी नेमणारयात्रा कालावधीत भाविकांना कोणतीही अडचण भासू नये म्हणून पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी प्रयत्न करणार आहेत. याचबरोबर ६१ वैद्यकीय अधिकारी, ९१ आरोग्य सेविका, ७१ शिपाई, २० वाहनचालक आदी जादा कर्मचारी नेमण्यात येणार आहेत.निधी मिळाला परंतु...आषाढी यात्रेसाठी दरवर्षी शासनाकडून निधी मिळतो परंतु या निधीतून मजूर संस्था व सुशिक्षित बेकार अभियंत्यांना कामे दिली जातात. यंदा प्रथमच सीईओ चंद्रकांत गुडेवार यांनी ग्रामपंचायतींना कामे देण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी ग्रामपंचायतींना कामाचे जि. प. मध्ये वाटपही झाले आहे.