महिलेला चापट मारत गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:43 IST2020-12-05T04:43:31+5:302020-12-05T04:43:31+5:30

सोलापूर : पत्ता विचारत महिलेला चापट मारून चाकूचा धाक दाखवत तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतल्याप्रकरणी अर्जुन प्रकाश जाधव (रा. ...

He slapped the woman and snatched the mangalsutra from her neck | महिलेला चापट मारत गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले

महिलेला चापट मारत गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले

सोलापूर : पत्ता विचारत महिलेला चापट मारून चाकूचा धाक दाखवत तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतल्याप्रकरणी अर्जुन प्रकाश जाधव (रा. मुळेगाव तांडा ) याच्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रमिला काळे या हातगाडीवर खारी व टोस्ट विक्रीचा व्यवसाय करतात. त्या बुधवारी सायंकाळी आपला व्यवसाय करत असताना आरोपी जाधवने फिर्यादी प्रमिला यांना राजू राठोड कुठे आहे असे विचारले. त्यावेळी फिर्यादी प्रमिला यांनी माहीत नाही असे सांगितले असता, आरोपी अर्जुन याने प्रमिला यांच्या गालावर चापट मारून शिवीगाळ केली व चाकूचा धाक दाखवून प्रमिला यांच्या गळ्यातील चार हजार रुपये किमतीचे दीड ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसकावून घेऊन निघून गेला.

Web Title: He slapped the woman and snatched the mangalsutra from her neck