शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याची वरदायिनी ‘उजनी’ने गाठला तळ

By admin | Updated: July 3, 2014 01:29 IST

पातळी मायनस : २० टक्के

करमाळा : लांबत चाललेल्या पावसामुळे उजनीच्या पाण्याने तळ गाठला असून, उजनी धरणाची पाणी पातळी आज मायनस २० टक्के इतकी खालावली आहे. यामुळे पिण्याच्या पाणीपुरवठा योजना संकटात सापडल्या आहेत.गत दोन वर्षांत कमी पावसामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. उजनी धरणाचा पाणीसाठाही निच्चांकी वजा ५० टक्क्यांपेक्षा कमी झाला होता. मागील वर्षी मात्र पुणे जिल्हा व भीमा खोऱ्यात झालेल्या पावसाच्या जोरावर उजनी धरण साठ्यात १२३ टीएमसी म्हणजे ११३ टक्के एवढा प्रचंड पाणीसाठा झाला होता. आज अखेर उजनी धरणातील पाणीसाठा वजा १०.२५ घनफूट म्हणजे २०.१८ टक्के आहे. धरणातील पाणीपातळी खालावली असल्याने उजनी धरण परिसरातील पिके पाण्याअभावी करपून सुकू लागली आहेत. पाणी घेण्यासाठी शेतकऱ्यांना पाईप वाढवून विद्युत मोटारी इतत्र हलवाव्या लागत आहेत तर पाणी पुरवठ्यासाठी जॅकवेलच्या चाऱ्या खोल कराव्या लागत आहेत. उजनी धरणातून करमाळा, बार्शी, कुर्डूवाडी, सोलापूर, उस्मानाबाद, तुळजापूर या शहराच्या पाणीपुरवठा योजना असून, या योजनेचे जॅकवेल हळूहळू उघडे पडू लागले आहेत. ---------------पाणीसाठा वजा १०.२५ घ. फू. म्हणजे २०.१८ टक्केगतवर्षी पाणीसाठा ११३ टक्के म्हणजे १२३ टीएमसीपाणीपुरवठा योजनेचे जॅकवेल उघडे पडू लागले.