आनंदाची बातमी; आता रेशनकार्ड नसलेल्यांनाही मिळणार तांदूळ अन् हरभरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 02:49 PM2020-06-17T14:49:59+5:302020-06-17T14:55:11+5:30

तांदूळ व हरभरा वाटपाचे नियोजन सुरू; जिल्हा पुरवठा अधिकाºयांची माहिती

Good news; Even those without ration card will get free foodgrains | आनंदाची बातमी; आता रेशनकार्ड नसलेल्यांनाही मिळणार तांदूळ अन् हरभरा

आनंदाची बातमी; आता रेशनकार्ड नसलेल्यांनाही मिळणार तांदूळ अन् हरभरा

Next
ठळक मुद्दे- लॉकडाऊन काळात सरकारचा चांगला दिलासा- गरीब, मजूर, सर्वसामान्यांना मिळाले धान्य- ग्रामीण भागातील जनतेने मानले सरकारचे आभार

सोलापूर : रेशन कार्ड नसलेल्यांनाही जूनअखेर तांदूळ व हरभरा मोफत देण्याची जिल्हा पुरवठा विभागातर्फे तयारी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील यांनी दिली.

कोरोना काळात घरी बसलेल्या दारिद्रय रेषेखालील अंत्योदय व केशरी रेशनकार्ड असलेल्यांना धान्य वितरित करण्यात आले, पण जिल्ह्यात कार्ड नसलेले अनेक जण वंचित राहिल यांच्या तक्रारी आल्यानंतर शासनाने अशा लोकांसाठी ही धान्य साठा जूनअखेर शहर व जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानांमध्ये धान्य उपलब्ध केले जाणार आहे.

या योजनेपासून कोणीही वंचित राहणार नाही याबाबतची दक्षता घेण्यात येणार आहे़ त्यामुळे रेशनकार्ड नसलेल्या लोकांना आता मोफत पाच किलो तांदूळ व हरभरा देण्यात येणार आहे.


 

Web Title: Good news; Even those without ration card will get free foodgrains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.