मिचेल स्टार्कची 'Power'! २४.७५ कोटीच्या खेळाडूची पैसा वसूल गोलंदाजी, SRH च्या ४ विकेट्स

ऑस्ट्रेलियाच्या या अनुभवी गोलंदाजाने आज त्याचा करिष्मा दाखवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 08:14 PM2024-05-21T20:14:17+5:302024-05-21T20:14:43+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 KKR vs SRH, Qualifier 1 Live Marathi : MITCHELL STARC ON FIRE, First travis  Head, then Nitish Reddy and now Shahbaz Ahmed; SRH 39/4 inside Powerplay, Video | मिचेल स्टार्कची 'Power'! २४.७५ कोटीच्या खेळाडूची पैसा वसूल गोलंदाजी, SRH च्या ४ विकेट्स

मिचेल स्टार्कची 'Power'! २४.७५ कोटीच्या खेळाडूची पैसा वसूल गोलंदाजी, SRH च्या ४ विकेट्स

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 KKR vs SRH, Qualifier 1 Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये कालपर्यंत मिचेल स्टार्कची ( MITCHELL STARC ) कामगिरी निराशाजनक झाली होती. १२ सामन्यांत त्याला १२ विकेट्सच घेता आल्या होत्या आणि त्याची इकॉनॉमी ११.३६ एवढी खराब होती. पण, ऑस्ट्रेलियाच्या या अनुभवी गोलंदाजाने आज त्याचा करिष्मा दाखवला. पहिल्याच षटकात ट्रॅव्हिड हेडचा त्रिफळा उडवल्यानंतर पाचव्या षटकात सलग दोन विकेट्स घेऊन हैदराबादची अवस्था ४ बाद ३९ अशी त्याने केली. 

मिचेल स्टार्कचा 'Spark'! ट्रॅव्हिस हेडचा भन्नाट चेंडूवर उडवला त्रिफळा, Video 


SRH चा कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकून KKR समोर तगडे लक्ष्य ठेवण्याचा निर्णय घेतला. पण, ज्यांच्या जीवावर कमिन्सने हे धाडस दाखवले, त्यांनी तोंडावर पाडले. पहिल्याच चेंडूवर अभिषेक शर्मा नॉन स्ट्रायकर एंडला रन आऊट होण्यापासून वाचला. श्रेयस अय्यरचा डायरेक्ट हीट KKR विकेट मिळवून देणारा ठरला असता. पण, मिचेल स्टार्कने दुसऱ्याच चेंडूवर SRH चा ओपनर ट्रॅव्हिस हेड याचा त्रिफळा उडवला. सलग दुसऱ्या सामन्यात हेड भोपळ्यावर बाद झाला. प्ले ऑफमध्ये भोपळ्यावर बाद होणारा तो SRH चा चौथा सलामीवीर ठरला. राहुल त्रिपाठीने सलग दोन चौकार खेचून दडपण कमी करण्याचा प्रयत्न केला, परंतु दुसऱ्या षटकात वैभव अरोराने SRH ला पहिला धक्का दिला. अभिषेक शर्माने ( ३) कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू आंद्रे रसेलने हवेत झेपावत सुरेख टिपला आणि SRH चे दोन्ही सलामीवीर १३ धावांवर माघारी परतले. 


तिसऱ्या षटकात स्टार्कने भन्नाट यॉर्कर टाकला होता आणि राहुल त्रिपाठीच्या बुटाला लागून तो बॅटवर आदळला. स्टार्क व श्रेयस अय्यर तिसऱ्या अम्पायरकडे दाद मागायची का नाही, या संभ्रमात दिसले. पण, त्यांनी DRS घेतला असता तर ही विकेटही मिळाली असती. पण, त्याची भरपाई स्टार्कने पुढच्या षटकात केली आणि नितीश कुमार रेड्डीला ( ९) जागेवरच चेंडू टोलवण्यास भाग पाडून KKR ला तिसरे यश मिळवून दिले. पुढच्याच चेंडूवर शाहबाज अहमदचा ( ०) त्रिफळा उडवून स्टार्कने त्याची तिसरी विकेट घेतली. हैदराबादला पॉवर प्लेमध्ये ४ बाद ४५ धावा करता आल्या. 

ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला आयपीएल २०२४च्या मिनी लिलावात सर्वाधिक भाव मिळाला होता. २ कोटी मूळ किंमत असलेल्या या ३३ वर्षांच्या खेळाडूला कोलकाता नाईट रायडर्सने तब्बल २४.७५ कोटी रुपये खर्चून स्वत:च्या संघात घेतले. त्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि गोलंदाजीचा जोडीदार पॅट कमिन्स याला मागे टाकले होते. स्टार्क हा २००८ पासून सुरू झालेल्या आयपीएल इतिहासातील सर्वांत महागडा खेळाडू बनला.  

Web Title: IPL 2024 KKR vs SRH, Qualifier 1 Live Marathi : MITCHELL STARC ON FIRE, First travis  Head, then Nitish Reddy and now Shahbaz Ahmed; SRH 39/4 inside Powerplay, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.