शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

50 फूट खोल विहिरीत पडला घोणस साप, सुटकेसाठी वापरली भन्नाट आयडिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 16:46 IST

घटना सविस्तर - बोरामणी ता दक्षिण सोलापूर 

सोलापूर - मल्लिनाथ बिराजदार ह्यांनी फोन वरुन वन्यजीव प्रेमी राहुल शिंदे माहिती दिली की दोन दिवसापासून विहिरीत एक साप पडला असून तो बाहेर पडु  शकत नाही. शिंदे ह्यांनी तात्काळ घटनचे माहिती वन विभागास कळविली. वनरक्षक बापू भुई व वन्यजीव प्रेमी राहुल शिंदे, नागनाथ हिंगमिरे, सुनिल अरळ्ळीकट्टी, औदुंबर गेजगे,मल्लिकार्जुन धुळखेडे, श्रीकांत बनसोडे, अभय फुले, प्रवीण जेऊरे, मुकुंद शेटे व वाहनचालक कृष्णा निरविणे घटनास्थळी दाखल झाले. 

५० फूट खोल विहिरी मध्ये उतरण्यासाठी कोणता मार्ग नव्हता. विहिर तळास फक्त दोन फूट पाणी असल्याने व उभ्या कडा असल्याने घोणस सापास पाणीतुन बाहेर पडण्यासाठी कोणताच मार्ग नव्हता.

ही वापरली भन्नाट आयडियाबोरी झाडाचा मोठा फाटा कट करुन त्यास दोन्ही बाजूने दोन वेगवेगळ्या दोरी बांधण्यात आल्या. व दोन बाजूने सावकाश विहिरीमध्ये सोडण्यात आले. घोणस साप बोरीच्या फाट्यावर येताच सावकाश दोन्ही बाजूने फाटा उचलण्यात आला. साप विषारी प्रजातीचा असल्याने सर्वती काळजी घेण्यात आली होती. साप बाहेर येतात तसाच तो फाटा  सुरक्षीत ठिकाणी ठेवण्यात आला. फाट्यावरुन घोणस खाली उतरून तिने निसर्गात मुक्त जीवन जगण्यासाठी दाट झाडीत निघून गेली व सर्व वन्यजीव प्रेमींच्या चेहरे  आनंदमय झाला.

 

टॅग्स :snakeसापSolapurसोलापूरforest departmentवनविभाग