शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

गेडाम पॅटर्न राज्यभर लागू होणार..!

By admin | Updated: October 23, 2014 14:42 IST

वाळू माफियांवर चाप बसविणे..शासनाचे महसुली उत्पन्न वाढविणे यामुळे सोलापूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी केलेल्या कामाची शासन पातळीवरुन दखल घेतली जात आहे.

सोलापूर : छोटे-छोटे वाळू ठेके बंद करणे...ऑनलाईन सिस्टमचा वापर..वाळू उपशाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे,वाळू माफियांवर चाप बसविणे..शासनाचे महसुली उत्पन्न वाढविणे यामुळे सोलापूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी केलेल्या कामाची शासन पातळीवरुन दखल घेतली जात आहे. पाठीमागील वर्षाचा विचार करता गेडाम पॅटर्नमुळे वाळू लिलावातून मिळणारे उत्पन्न पाच पटीने वाढले आहे. सप्टेंबरअखेर वाळू लिलावातून ५९ कोटी रुपये मिळाले आहेत, हे विशेष. 

मुंबईत मंगळवारी उपमुख्य सचिव एस.एस. संधू यांनी सोलापुरातील या प्रणालीचे कौतुक केले. राज्यभर यानुसार वाळू लिलाव करता येईल का याचा विचार सुरू आहे. सोलापुरातील ही प्रणाली पाहण्यासाठी आजवर अहमदनगर, गडचिरोली, पुणे आदी पाच जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनातील अधिकार्‍यांनी पाहणी केली आहे. वाळू ठेक्यातून किती वाळू उपसली, किती वाळू उपसा करणे बाकी आहे, किती पैसे भरले, कोणत्या वाहनातून ती नेण्यात आली ही सर्व माहिती या ऑनलाईन सिस्टममुळे मिळते. यापूर्वी जिल्ह्यातील वाळू उपशाचे छोटे-छोटे ठेके काढले जात होते. मात्र जिल्हाधिकारी गेडाम यांनी याला चाप बसविला. वाळूचे छोटे- छोटे प्लॉट एकत्रित करुन लिलाव काढले जात आहेत. वाळू उपशावर नियंत्रण ठेवण्यासाठी 'महामायनिंग' हे सॉप्टवेअर विकसित केले आहे. या माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर वाळू माफियांवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असून, महसूलदेखील मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. राज्यभर नव्हे तर देशभरदेखील या पध्दतीचा अवलंब होऊ शकतो. (प्रतिनिधी) 
२३ लाख ब्रास वाळूचा प्रस्ताव 
■ गेल्या वेळी १९ ठिकाणांच्या २0 लाख ब्रास वाळूचा लिलाव काढण्यात आला होता. त्यापैकी ६ लाख ब्रासचा लिलाव झाला. त्यातून ५९ कोटी रुपये मिळाले. यापूर्वीचे वाळू लिलाव पाहता हा महसूल खूप मोठय़ा प्रमाणावर आहे. यातील मंगळवेढा तालुक्यातील मिरी येथील ठेका हा १.३१ लाख ब्रासचा होता. त्यातून शासनाला १७ कोटी मिळाले आहेत. हा राज्यातील सर्वात मोठा ठेका होता. या सर्व ठेक्यांची ३0 सप्टेंबर रोजी मुदत संपली आहे. आता २३ लाख ब्रास वाळू लिलाव करण्याचा प्रस्ताव आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने याला मंजुरी दिली असून विभागीय आयुक्तांकडे हा प्रस्ताव आहे.