शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आले वैष्णव डिंगर

By admin | Updated: July 7, 2014 01:10 IST

प्रमुख पालख्या; वैष्णवांची मांदियाळी पंढरपूर तालुक्यात

 भंडीशेगाव: आषाढीचा सुखसोहळा पाहण्याच्या उत्कट ओढीने गेले काही दिवस ऊन, वाऱ्याची तमा न बाळगता अखंड हरिनामाचा गजर करीत श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज, श्रीसंत सोपानकाका या पालख्यांसह लाखो संतसज्जनांच्या मांदियाळीने आज टप्पा येथे पंढरपूर तालुक्यात प्रवेश केला. ठाकुरबुवांच्या समाधीजवळ व्यवहारे व कोळेकर यांच्या शेतात आज सकाळी माऊलींच्या सोहळ्यातील तिसरे गोल रिंगण झाले. आजचे वैशिष्ट्य म्हणजे रिंगण सोहळा पाहण्यासाठी सोहळ्याचे मानकरी श्रीमंत उर्जितसिंह शितोळे-सरकार व महादजीराजे शितोळे-सरकार उपस्थित होते.विस्तीर्ण पटांगणात झालेल्या रिंगणात अश्वांनी चार फेऱ्या मारल्या. त्यानंतर उडीचा खेळ खेळून चिंब झालेला सोहळा तोंडले येथे दुपारच्या भोजनाला आला. दरम्यान, अकलूजहून आलेला जगद्गुरू तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा धावा करून बोंडले येथे दाखल झाला. तर यावेळी बोंडले येथेच सोपानकाकांची पालखी विसावा घेत होती. सर्वात पुढे तुकाराम महाराज त्यानंतर सोपानकाका आणि ज्ञानेश्वर माऊली या तीन प्रमुख पालख्यांसह विविध पालख्यांनी आज टप्पा येथे पंढरपूर तालुक्यात प्रवेश केला.पालख्यांच्या स्वागतासाठी आ. बबनराव शिंदे, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, पं.स. सभापती पुष्पा जाधव, उपसभापती विष्णू बागल, प्रांताधिकारी संजय तेली, तहसीलदार गजानन गुरव, गटविकास अधिकारी ईशाधीन शेळकंदे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संभाजी शिंदे, उपप्रमुख महादेव आयरे, केसकरवाडीचे सरपंच हणमंत मासाळ, पं.स. सदस्य तानाजी केसकर, सहकार शिरोमणीचे संचालक पांडुरंग कौलगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले उपस्थित होते.----------------------------पालखी मार्गाने पंढरपूर तालुक्यात प्रवेश करणाऱ्या पालख्याआज श्रीसंत तुकाराम महाराज, श्रीसंत सोपानकाका, श्रीसंत ज्ञानेश्वर माऊली, श्रीसंत जगनाडे महाराज, श्रीसंत निळोबाराय महाराज, श्रीसंत कान्हुराज महाराज, श्रीसंत बालयोगी, श्रीसंत गोरोबाकाका आदी पालख्यांनी पंढरपूर तालुक्यात प्रवेश केला.सोपानकाका-माऊलींची बंधूभेटश्रीसंत सोपानकाकांची पालखी दसूरपाटी येथे विसावा घेत असताना माऊलींची पालखी बाजूने पुढे गेली. टप्पा येथे माऊलींची पालखी विसावा घेत असताना सोपानकाकांची पालखी माऊलींच्या पालखीजवळ आली. यावेळी दोन्ही बंधूंच्या पालख्यांची भेट घडवून आणण्यात आली. दोन्ही पालख्यांच्या मानकऱ्यांनी एकमेकांना नारळ प्रसाद देऊन पादुकांचे दर्शन घेतले. सायंकाळी माऊलींची पालखी भंडीशेगाव मुक्कामी तर तुकोबांची पालखी पिराची कुरोली येथे मुक्कामी गेली.