शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

दान आणि पुण्याचा सण म्हणजे मकर संक्रांत...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 11:52 IST

मकर संक्रांत हा जानेवारी महिन्यात आणि हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येणारा एक महत्त्वपूर्ण सण आहे.

दान आणि पुण्याचा सण म्हणजे मकर संक्रांत आज संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. मकर संक्रांत हा जानेवारी महिन्यात आणि हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येणारा एक महत्त्वपूर्ण सण आहे. या दिवशी सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. या प्रक्रियेला संक्रांति म्हटलं जातं. या दिवशी सूर्य हा धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून याला मकर संक्रांत म्हणतात

मकर संक्रांतच्या दिवशी बरेच महत्वाचे ग्रह एकत्रित येतात. या दिवशी सूर्य, शनि, गुरु, बुध आणि चंद्र मकर राशीत राहतील. जे शुभ योग निर्माण करतात. म्हणूनच या दिवशी केलेले दान तुमच्या जीवनात पुण्य, आनंद आणि समृद्धी आणते.

स्नान आणि दानाचं महत्त्व काय?मकर संक्रांतच्या दिवशीच भागीरथच्या विनंती आणि तपस्येने प्रसन्न होऊन गंगा त्यांच्या मागे-मागे कपिल मुनी यांच्या आश्रमात पोहोचली आणि तिथून ती समुद्रात जाऊन मिसळली. याच दिवशी राजा भागीरथने गंगेच्या पवित्र जलने आपल्या पूर्वजांचं तर्पण केलं होतं. त्यामुळे मकर संक्रांतच्या दिवशी गंगेत स्नान करणे अत्यंत शुभ आणि लाभदायी मानलं जातं.

यादिवशी गंगेत स्नान केल्याने सर्व पापातून मुक्तता मिळते. यादिवशी केलं जाणारं स्नान आणि दान वैकुंठात असलेल्या देवांपर्यंत पोहोचतं, अशी मान्यता आहे. जे लोक गंगेत स्नान नाही करु शकत ते घरीच पाण्यात गंगा जल मिसळून स्नान करु शकतात.

मकर संक्रांतचा शुभ मुहूर्तयावर्षी मकर संक्रांतला पूजा करण्यासाठी सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.46 ही वेळ शुभ आहे. त्यामुळे तुम्ही या वेळेत पूजाविधी करु शकता. तसेतर नेहमी हा सण 14 जानेवारी रोजी येतो. परंतु, एखाद्या वर्षी ही तारीख मागे-पुढे होते. हिंदू धर्मामध्ये संक्रांत ही एक देवता मानली जाते. पौराणिक कथेनुसार, ही देवता दरवर्षी येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते.

मकर संक्रात पूजाविधीमकर संक्रातच्या दिवशी अंघोळ करुन सूर्याला अर्घ्य द्यावे. या दिवशी महिला पूजा करतात. नंतर विवाहित स्त्रिया सुगड म्हणजे छोट्या मातीच्या मडक्यांना हळदी-कुंकवाची बोटे लावून दोरा गुंडाळतात. सुगडांमध्ये गाजर, बोरे, उसाची पेरे, शेंगा, कापूस, हरभरे, तीळगूळ, कच्ची खिचडी, इत्यादी भरतात. हे सुगडं पाटावर ठेवून त्या भोवती रांगोळी काढली जाते. यातील एक सुगड देवासमोर आणि एक सुगड तुळशीजवळ ठेवलं जातं. त्यानंतर किमान पाच सवाष्णींना वाण देतात. या दिवशी हळदीकुंकू समारंभ करुन तीळगूळ वाटतात. तुम्ही मकर संक्रांत ते रथसप्तमीपर्यंत हळदीकुंकू समारंभ करु शकता.

दक्षिणायन-उत्तरायणआपण जर दररोज सूर्याच्या उगवण्याच्या किंवा मावळण्याच्या जागेचे निरीक्षण केले तर सूर्याची बदललेली जागा लक्षात येईल. ज्यावेळेस पृथ्वीची उत्तर ध्रृवाकडील बाजू सूर्याच्या जवळ येते तेव्हा सूर्य जास्तीत जास्त उत्तरेला सरकलेला असतो. 21 मार्च ते 21 जूनपर्यंत सूर्य उत्तरेला सरकतो. यालाच ‘उत्तरायण’ असे म्हणतात. तर 22 सप्टेंबर ते 22 डिसेंबरपर्यंत सूर्य दक्षिण दिशेला सरकतो. यालाच ‘दक्षिणायन’ असे म्हणतात. तर 22 मार्च आणि 22 सप्टेंबर या दोन दिवशी सूर्य बरोबर पूर्व दिशेला उगवतो. या दोन तारखांना ‘विषुवदिन’ असे म्हणतात. या दिवशी दिवस-रात्र समान बारा-बारा तासांचे असतात.

भीष्म पितामह यांचा शरीर त्यागमकर संक्रांतचा दिवश वैकुंठ प्राप्त करण्याचा दिवस आहे. भीष्म पितामहने मकर संक्रांतच्या दिवशीच्या प्रतिश्रेत तब्बल नऊ दिवस कुरुश्रेत्रात बाणांच्या शैयैवर होते. मकर संक्रांतच्या दिवशी त्यांनी त्यांच्या शरिराचा त्याग केला.

- अभिनंदन गायकवाड, सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरMakar Sankrantiमकर संक्रांती