शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

दुष्काळात चारा पिकवण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील ५३५ शेतकरी सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 10:48 AM

विहिरींचे अधिग्रहण: पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नियोजन

ठळक मुद्देजिल्ह्याच्या सरासरीच्या केवळ ३८ टक्के पाऊसजिल्ह्यात सध्यस्थितीत ओला व सुका चारा १४८१ लाख मे.टन उपलब्धकाही महिन्यात चारा व पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार

सोलापूर : दुष्काळात जनावरं जगावीत यासाठी मुबलक चारा उपलब्ध व्हवा म्हणून शासनाकडून गाळपेर जमिनी १ रुपये हेक्टर दराने चारा पिकवण्यासाठी जमिनी दिल्या जात आहेत. या आवाहन शेतकºयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. बुधवारीपर्यंत यासाठी ५३५ शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरसावले आहेत. याशिवाय चारा गावांमध्ये नऊ ठिकाणी विहिरी व बोअरचे अधिगृहण करुन पाणीपुरवठा करण्यात आहे. 

जिल्ह्याच्या सरासरीच्या केवळ ३८ टक्के पाऊस झाल्यामुळे येणाºया काही महिन्यात चारा व पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. चारा टंचाईमध्ये २०१२-१३ च्या दुष्काळाच्या वेळेस १९३ तर २०१३-१४ मध्ये २७८ छावण्या उघडण्यात आल्या होत्या. या छावण्यांमध्ये २ लाख २० हजार ९१८ मोठी जनावरे, ३३ हजार ७०९ लहान जनावरे दाखल झाली होती. यावर्षीच्या नियोजनाप्रमाणे २ लाख ३० हजार १४४ लहान व ९ लाख ४९ हजार ८२२ अशी एकूण ११ लाख ८० हजार २६ इतकी जनावरे आहेत. या जनावरांना प्रतिदिन  ६३०० मे.टन चारा लागतो. 

जिल्ह्यात सध्यस्थितीत ओला व सुका चारा १४८१ लाख मे.टन उपलब्ध असून फेब्रुवारीपर्यंत हा साठा पुरेल असा प्रशासनाचा अंदाज आहे. जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणार्थ विहीर अधिग्रहण, तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना, बुडक्या घेणे असा एकूण १ हजार ५२६ योजनांचा टंचाई आराखडा केला आहे त्यावर ३७ कोटी ९ लाख २९ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत.

यंदा कमी पर्जन्यामुळे  चाºयामध्ये घट झाली आहे. त्यामुळे निर्माण होणाºया चारा टंचाईवर मात करण्यासाठी शासनाकडून एक रुपया प्रति हेक्टर या नाममात्र दरावर चारा लावण्यासाठी जमिनी देण्यात येणार आहे. या उपक्रमाची पशपालकांना थोडाफार आधार मिळणार आहे. 

जिल्ह्यात नऊ विहिरी, बोअर अधिग्रहणच्गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील टंचाईसदृश गावांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या तिसºया आठवड्यात जिल्ह्यात तीन ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग या ठिकाणी ६ विहिरी व बोअर अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. करमाळा तालुक्यातील वरकुटे, माढा तालुक्यातील वडाचीवाडी,पडसाळी या ठिकाणी  प्रत्येकी एक विहीर अधिग्रहण अशा नऊ ठिकाणी विहीर, बोअर अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयdroughtदुष्काळAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचारWaterपाणी