दुष्काळात चारा पिकवण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील ५३५ शेतकरी सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 10:48 AM2018-11-22T10:48:30+5:302018-11-22T10:50:37+5:30

विहिरींचे अधिग्रहण: पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नियोजन

In the famine, 535 farmers of Solapur district have become farmers | दुष्काळात चारा पिकवण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील ५३५ शेतकरी सरसावले

दुष्काळात चारा पिकवण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील ५३५ शेतकरी सरसावले

Next
ठळक मुद्देजिल्ह्याच्या सरासरीच्या केवळ ३८ टक्के पाऊसजिल्ह्यात सध्यस्थितीत ओला व सुका चारा १४८१ लाख मे.टन उपलब्धकाही महिन्यात चारा व पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार

सोलापूर : दुष्काळात जनावरं जगावीत यासाठी मुबलक चारा उपलब्ध व्हवा म्हणून शासनाकडून गाळपेर जमिनी १ रुपये हेक्टर दराने चारा पिकवण्यासाठी जमिनी दिल्या जात आहेत. या आवाहन शेतकºयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. बुधवारीपर्यंत यासाठी ५३५ शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरसावले आहेत. याशिवाय चारा गावांमध्ये नऊ ठिकाणी विहिरी व बोअरचे अधिगृहण करुन पाणीपुरवठा करण्यात आहे. 

जिल्ह्याच्या सरासरीच्या केवळ ३८ टक्के पाऊस झाल्यामुळे येणाºया काही महिन्यात चारा व पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. चारा टंचाईमध्ये २०१२-१३ च्या दुष्काळाच्या वेळेस १९३ तर २०१३-१४ मध्ये २७८ छावण्या उघडण्यात आल्या होत्या. या छावण्यांमध्ये २ लाख २० हजार ९१८ मोठी जनावरे, ३३ हजार ७०९ लहान जनावरे दाखल झाली होती. यावर्षीच्या नियोजनाप्रमाणे २ लाख ३० हजार १४४ लहान व ९ लाख ४९ हजार ८२२ अशी एकूण ११ लाख ८० हजार २६ इतकी जनावरे आहेत. या जनावरांना प्रतिदिन  ६३०० मे.टन चारा लागतो. 

जिल्ह्यात सध्यस्थितीत ओला व सुका चारा १४८१ लाख मे.टन उपलब्ध असून फेब्रुवारीपर्यंत हा साठा पुरेल असा प्रशासनाचा अंदाज आहे. जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणार्थ विहीर अधिग्रहण, तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना, बुडक्या घेणे असा एकूण १ हजार ५२६ योजनांचा टंचाई आराखडा केला आहे त्यावर ३७ कोटी ९ लाख २९ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत.

यंदा कमी पर्जन्यामुळे  चाºयामध्ये घट झाली आहे. त्यामुळे निर्माण होणाºया चारा टंचाईवर मात करण्यासाठी शासनाकडून एक रुपया प्रति हेक्टर या नाममात्र दरावर चारा लावण्यासाठी जमिनी देण्यात येणार आहे. या उपक्रमाची पशपालकांना थोडाफार आधार मिळणार आहे. 

जिल्ह्यात नऊ विहिरी, बोअर अधिग्रहण
च्गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील टंचाईसदृश गावांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या तिसºया आठवड्यात जिल्ह्यात तीन ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग या ठिकाणी ६ विहिरी व बोअर अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. करमाळा तालुक्यातील वरकुटे, माढा तालुक्यातील वडाचीवाडी,पडसाळी या ठिकाणी  प्रत्येकी एक विहीर अधिग्रहण अशा नऊ ठिकाणी विहीर, बोअर अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

Web Title: In the famine, 535 farmers of Solapur district have become farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.