शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बनावट चावीने पळविला ट्रक

By admin | Updated: June 3, 2014 01:11 IST

महुद येथील घटना; सांगोला पोलिसांकडून तपास सुरू

सांगोला : अज्ञात चोरट्याने बनावट चावीने १० लाख किमतीचा मालट्रक चालू करून पळवून नेल्याची घटना सोमवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास महुद बु॥ (ता. सांगोला) येथील महुद-दिघंची रोडवरील वर्दळीच्या ठिकाणी घडली. येथील श्रीमती कुसुम नंदकुमार विभुते यांच्या मालकीचा (क्र. एम. एच. ४५/ 0४९२) हा मालट्रक असून काल रविवारी नेहमीप्रमाणे महुद-दिघंची रोडवरील शिवाजी विभुते यांच्या गाळ्यासमोर रिकामा मालट्रक उभा केला होता. सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास कुसुम विभुते यांचा मुलगा बसवेश्वर विभुते विहिरीवर आंघोळीला जात असताना मालट्रक नेहमीच्या ठिकाणी उभा केला होता. विहिरीवरुन आंघोळ करून घरी परत येत असताना उभ्या केलेल्या ठिकाणचा मालट्रक गायब असल्याचे दिसून आले. या दरम्यान बसवेश्वर विभुते यांनी चौकशी केली असता सदरचा मालट्रक पंढरपूरच्या दिशेने गेल्याचे पाहिले असल्याचे सांगण्यात आले. घडल्या प्रकाराची माहिती बसवेश्वर विभुते यांनी सांगोला पोलिसांना दिली. यावेळी पो. नि. दयानंद गावडे यांनी वायरलेसवरुन मालट्रक पळवून नेल्याची माहिती वरिष्ठ कार्यालयाकडे कळविली. सोमवारी दिवसभर पोलिसासह विभुते कुटुंबीय, नातेवाईक, मित्र परिवार चोरीस गेलेल्या मालट्रकचा सर्वत्र शोध घेत होते; मात्र रात्री उशिरापर्यंत ट्रकचा तपास लागला नाही.

-------------------------

चारचाकी वाहन चोरीची दुसरी घटना

येथील महादेव आण्णा लवटे यांचे पंढरपूर रोडवरील नव्या पेठेत भुसार मालाचे दुकान असून दुकानापुढे जीप उभा करून शेतात गेले होते. अज्ञात चोरट्याने मध्यरात्रीची संधी साधून जीप चोरुन नेली होती. या चोरीचा तपास अद्याप सांगोला पोलिसाकडून लागला नाही. तोच पुन्हा महुद बु॥ येथून व्यापार्‍याचा मालट्रक पळवून नेल्याची घटना घडल्याने नागरिकांतून उलटसुलट चर्चा सुरु आहे.