शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
4
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
5
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
6
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
7
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
8
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
9
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
11
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
12
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
14
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
15
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
16
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
17
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
18
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
19
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
20
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पावणेतीन लाख प्रॉपर्टी कार्डस्‌चे डिजिटलायझेशन;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:45 IST

हेमंत सानप यांची माहिती बनावटगिरीला लागेल लगाम लोकमत न्यूज नेटवर्क सोलापूर : राज्य शासनाने राज्यातील मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) ...

हेमंत सानप यांची माहिती

बनावटगिरीला लागेल लगाम

लोकमत न्यूज नेटवर्क

सोलापूर : राज्य शासनाने राज्यातील मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) ऑनलाईन (डिजिटलायझेशन) करण्याचे काम हाती घेतले. सोलापूर जिल्ह्यात २ लाख ९९ हजार ६५४ मिळकतपत्रिका असून, याचे ९४ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक हेमंत सानप यांनी दिली.

जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जमिनीची मोजणी करून देणे आणि नगर भूमापन (सिटी सर्व्हे) झालेल्या मिळकतीवर फेरफार नोंदणी करण्यासाठी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय आहे. जिल्ह्यातील ११ तालुक्यांमधील ३५३ गावात सिटी सर्व्हे झाला आहे. जिल्ह्यातील परिरक्षण भूमापकाचे काम झाले असून, अंतिम तपासणी करून लवकरच सर्व मिळकतपत्रिका जनतेला ऑनलाईन उपलब्ध होतील, असे सानप यांनी सांगितले.

जिल्ह्यात २ लाख ९९ हजार ६७४ मिळकतपत्रिकांची तपासणी लवकरच करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १ लाख १२ हजार ७७५ मिळकतपत्रिकांच्या डिजिटल स्वाक्षरीचे काम पूर्ण झाले असल्याने मिळकतदारांना लवकरच ऑनलाईन मालमत्ता पाहता येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.