शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

धर्मा भोसलेंचाही राजीनामा

By admin | Updated: May 21, 2014 01:01 IST

ब्लॉक अध्यक्षांचेही राजीनामे : गुरुसिद्ध म्हेत्रे वेटिंगवर

सोलापूर : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये पडझड सुरू झाली. त्यांच्यापाठोपाठ शहराध्यक्ष धर्मा भोसले आणि ब्लॉकच्या पाच अध्यक्षांनीही प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे राजीनामे पाठविले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांचा दारुण पराभव झाल्याने पक्षात नाराजीची लाट पसरली आहे. जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा दिला. त्यांच्यापाठोपाठ शहराध्यक्ष धर्मा भोसले, ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष सिद्धाराम चाकोते, माणिकसिंग मैनावाले, संजय बनसोडे, जाबीर अल्लोळी, डॉ. साहेबराव गायकवाड यांनीही आपल्या पदाचे राजीनामे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे पाठविले आहेत.

--------------------------

म्हेत्रे यांचाही निर्णय राजीनाम्यासाठी पक्षातून येणार्‍या दबावाला न जुमानणार्‍या गुरुसिद्ध म्हेत्रे यांनीही अखेर पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. तोही काँग्रेसच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून. संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष आनंदकुमार अंत्रोळीकर यांनी आपला राजीनामा दिला. मंगळवारी माळकवठ्याचे सरपंच पंचाक्षरी स्वामी यांनी सभापती इंदुमती अलगोंड यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला. राजीनाम्यांचे लोण मंद्रुपपर्यंत पोहोचले. दक्षिण तालुकाध्यक्ष गुरुसिद्ध म्हेत्रे यांच्या राजीनाम्यासाठी पक्षातला एक गट सक्रिय होता. परंतु म्हेत्रे त्यांना दाद देत नव्हते. शेळके यांच्या राजीनाम्यानंतर आता म्हेत्रे यांनीही राजीनामा देण्याची तयारी केली आहे. त्यांच्यासह चार-पाच तालुकाध्यक्षांनी राजीनाम्याची इच्छा व्यक्त केली असून जिल्हाध्यक्षांनीच पद सोडल्याने त्यांचा राजीनामा कोण स्वीकारणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. २३ मे रोजी पक्षाच्या प्रदेश कमिटीची मुंबईत बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीचे निमंत्रण तालुकाध्यक्षांनाही असल्याने थेट प्रदेशाध्यक्षांकडेच आपला राजीनामा सोपवणार असल्याचे म्हेत्रे यांनी सांगितले.

------------------------

तालुकाध्यक्षपदावर काम करताना अडचणी आल्या. परंतु सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अडचणींवर मात करण्यात यशस्वी ठरलो. शिंदे यांचा पराभव झाल्यामुळे आता पदावर राहण्यात रस नाही. -गुरुसिद्ध म्हेत्रे, तालुकाध्यक्ष