शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

ढिगारा कोसळून एकाचा मृत्यू

By admin | Updated: July 5, 2014 00:14 IST

वाढेगाव येथील घटना : महिन्यात लागोपाठ दुसरी घटना

वाढेगाव : सिमेंट बंधाऱ्याचे बांधकाम सुरू असताना अचानक मातीचा ढिगारा कोसळून एक जण जागीच ठार झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. वाढेगाव (ता. सांगोला) येथे वाढेगाव-सावे रोडनजीक शुक्रवारी दुपारी १२़३० वाजता ही घटना घडली. विठोबा वसराम जाधव (वय ५०, रा. वलडसंग, ता. होर्ती, जि. विजापूर) असे मयताचे नाव असून, महादेवी विठोबा जाधव (वय १५) व सुभाष नामदेव जाधव (वय ३०, रा. वलडसंग, ता. होर्ती, जि़ विजापूर) ही जखमींची नावे आहेत.यापूर्वी २० जून रोजी विहिरीचा कठडा कोसळून सात जणांचा बळी गेला होता. ही घटना ताजी असतानाच आज दुपारी दुसरी घटना घडली. वाढेगाव-सावे रस्त्यालगत (संजयनगर) येथील जि़ प़ प्राथमिक शाळेच्या पाठीमागे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत नाला सरळीकरण व सिमेंट नालाबंडिंगचे काम सुरू आहे. या बंधाऱ्याची खोली १५ ते २० फुटाच्या आसपास आहे. विजापूर व वाढेगाव येथील मजूर या कामावर आहेत. भिंतीचे बांधकाम सुरू असताना शुक्रवारी दुपारी अचानक मातीचा ढिगारा कोसळल्याने त्याखाली दबून विठोबा वसराम जाधव यांचा मृत्यू झाला.जखमींवर सांगोला येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी सांगोल्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील, पो. नि. अजय कदम यांनी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. तासानंतर जेसीबी व ग्रामस्थांच्या साहाय्याने गाडला गेलेला मृतदेह काढण्यात प्रशासनाला यश आले.---------------------म्हणून ते चौघे बचावले़़़अचानक झालेल्या घटनेमुळे कामावरील मजुरांमध्ये एकच गोंधळ उडाला. घटनास्थळी असलेले बिंडू दिघे, साहेबराव दिघे, विनायक मोरे, श्रीकांत दिघे यांच्यासह अन्य कामगारांनी महादेवी विठोबा जाधव व सुभाष नामदेव जाधव या दोघांना मातीच्या ढिगाऱ्यातून काढल्याने ते बालंबाल बचावले. तसेच या ठिकाणी पाच मजूर काम करीत होते. मात्र टमटममध्ये बंधाऱ्याच्या कामासाठी लागणारी सळई आणल्यानंतर त्यातील विनायक मोरे व श्रीकांत दिघे हे मजूर वाहनातील सळई काढण्यासाठी वर आल्याने ते दोघे बचावले.--------------------------------दोन्ही दुर्घटना शुक्रवारीचयापूर्वी २० जून रोजी शुक्रवारी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली होती़ आजही शुक्रवार आणि वेळही दुपारी १२.३० ची होती. या दोन्ही घटना घडल्या त्याची वेळ आणि वार एकच होता़