शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

बाप रे...११० किलो वजनाची सापडलेली मगर उजनीलगतच्या वनक्षेत्रातच सोडली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2019 12:59 PM

परिसरात भीतीचे वातावरण; कात्रज येथे मगर ठेवण्यासाठी उपाययोजना नसल्याचे दिले कारण

ठळक मुद्देचार दिवसांपूर्वी भीमानगर परिसरात महाकाय मगर सापडली मच्छीमार आणि शेतकरी यांनी सुटकेचा नि:श्वास सोडलामहाकाय मगर वनविभागाने पुन्हा उजनी किनारी असणाºया वनविभागाच्या अधिवासात सोडली

सोलापूर/ भिगवण : उजनी धरणात मगर आहे, अशा चर्चा मागील  दोन वर्षांपासून होत होत्या. चार दिवसांपूर्वी भीमानगर परिसरात महाकाय मगर सापडली आणि मच्छीमार आणि शेतकरी यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र ती महाकाय मगर वनविभागाने पुन्हा उजनी किनारी असणाºया वनविभागाच्या अधिवासात सोडली आहे. तसेच ही मगर कोणत्या ठिकाणी सोडली, हे मात्र वनविभागाने सांगितले नाही. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील वनक्षेत्रानजीक असणाºया परिसरामध्ये भीतीचे वातावरण आहे. 

उजनी धरणातील पाण्यात मगरी आढळत असल्याच्या चर्चा गेल्या दोन-तीन वर्षांपासून होत आहेत. करमाळा तालुक्यातील कंदर येथे मच्छीमारीच्या जाळीत मगर अडकली होती तर उजनी येथील भीमानगर येथील मत्स्य केंद्राच्या तळ्यामध्ये मगरी असल्याची माहिती मिळत होती तर इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव, तक्रारवाडी आणि डिकसळ परिसरातही मच्छीमारांना मगरीने दर्शन दिले असल्याची माहिती मिळत आहे, असे असताना दोन दिवसांपूर्वी १२ फूट लांब आणि जवळपास १५० ते २०० किलो वजनाच्या महाकाय मगरीला भोई समाजातील महादेव नगरे, मामू भोई, नितीन सल्ले, अशोक पतुले, रवींद्र नगरे या मच्छीमार तरुणांनी जीवाची बाजी लावून पकडण्यात यश मिळविले होते. तसेच या महाकाय मगरीला पकडून वनविभागाच्या हवाली करण्यात आले होते. 

मात्र वनविभागाने ही मगर धुमाळवाडी येथील उजनीशेजारील वनक्षेत्रात सोडल्याची माहिती मिळाल्याने शेतकरी तसेच मच्छीमार धास्तावून गेल्याचे सांगण्यात येत  आहे. 

पर्यटकांसह शेतकºयांमध्ये पसरली भीती- या ठिकाणी देशभरातून अनेक पर्यटक परदेशी पक्ष्यांना पाहण्यासाठी येत असतात. त्यांच्या जीवितालाही धोका असल्याचे बोलले जात आहे. मगर या भागात सोडल्याच्या माहितीमुळे शेतकरी शेताला पाणी देण्यास जाण्यासाठी घाबरू लागल्याचे सांगितले जात आहे. उजनी धरणाच्या किनारी असणाºया वनविभागाच्या क्षेत्रालगत अनेकांची बागायत शेती असून, जर वनविभागाने या ठिकाणी मगर सोडली असेल तर ते अत्यंत धोक्याचे असल्याचे सांगितले. तर वन्यजीव महत्त्वाचे असले तरी त्याचा मानवी जीवनावर धोका असेल तर याचा शासनाने विचार करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

मगर इंदापूर तालुक्यातील वनक्षेत्रात मुक्त केली असल्याचे सांगितले. मात्र ती मगर नक्की कोणत्या ठिकाणी सोडली, हे सांगता येणार नाही. तसेच सापडलेल्या मगरीवर उपचार करण्यासाठी राजीव गांधी अनाथालयातील पथक आले होते. मात्र कात्रजला ठेवण्यासाठी उपाययोजना नसल्यामुळे तसेच वन्यजीव कायद्यानुसार मगर वनविभागाच्या अधिवासात सोडली.- राहुल काळेवनपरिक्षेत्र अधिकारी, इंदापूर 

वनविभागाने उजनी किनारी असणाºया वन क्षेत्रात मगर सोडली असल्याची माहिती काही मच्छीमार बांधवांनी दिली आहे. यातून मच्छीमारांच्या जीविताला धोका पोहोचू शकतो आणि याची जबाबदारी वनविभाग घेणार आहे का? अशाप्रकारे मगर सोडल्याचे निष्पन्न झाल्यास मच्छीमार आंदोलन करणार आहेत. - नंदकुमार नगरे, महाराष्ट्र राज्य संघर्ष कृती समिती

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणWaterपाणीPuneपुणेkatrajकात्रज