वीजचोरीप्रकरणी सोलापुरातील चौघां ग्राहकांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 14:30 IST2018-10-27T14:26:57+5:302018-10-27T14:30:57+5:30

सोलापूर : सोरेगाव परिसरात वीज चोरी केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तानाजी ...

Crime against four consumers of Solapur power plant | वीजचोरीप्रकरणी सोलापुरातील चौघां ग्राहकांविरुद्ध गुन्हा

वीजचोरीप्रकरणी सोलापुरातील चौघां ग्राहकांविरुद्ध गुन्हा

ठळक मुद्देसदर बझार पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखलचार लोकांनी वीज चोरून घेतल्याचे निदर्शनास आले. महावितरण कंपनीचे कर्मचारी महेश मल्लिकार्जुन कटारे यांनी फिर्याद दिली

सोलापूर : सोरेगाव परिसरात वीजचोरी केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तानाजी गंगाधर वाघमारे (रा. व्ही.व्ही.पी. कॉलेज रोड, देवनगर सोरेगाव), नागनाथ वीरभद्रप्पा आळंगे (रा. विजापूर नाक्याजवळील शिवारातील हत्तुर), खंडू बलभीम उबाळे, भोजप्पा मालप्पा वाघमारे (दोघे रा. व्ही.व्ही.पी. कॉलेज देवनगर, देगाव सोरेगाव) अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत.

महावितरण कंपनी सोरेगाव शाखेच्या वतीने १८ आॅक्टोबर रोजी केलेल्या तपासणीमध्ये चार लोकांनी वीज चोरून घेतल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी सोरेगाव शाखेच्या महावितरण कंपनीचे कर्मचारी महेश मल्लिकार्जुन कटारे (वय ३७) यांनी फिर्याद दिली आहे. तपास पो.हे.कॉ. भालेराव करीत आहेत. 

Web Title: Crime against four consumers of Solapur power plant