शेजबाभुळगावामधील मारहाणीत २५ जणांविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:26 IST2021-01-16T04:26:11+5:302021-01-16T04:26:11+5:30

मोहोळ : तालुक्यात शेजबाभुळगाव येथे मतदानप्रक्रिया पार पडल्यानंतर रात्री दोन गटांमध्ये हाणामारीचा प्रकार घडला. या हाणामारीत २५ लोकांविरुद्ध ...

Crime against 25 people in Shejbabhulgaon | शेजबाभुळगावामधील मारहाणीत २५ जणांविरोधात गुन्हा

शेजबाभुळगावामधील मारहाणीत २५ जणांविरोधात गुन्हा

मोहोळ : तालुक्यात शेजबाभुळगाव येथे मतदानप्रक्रिया पार पडल्यानंतर रात्री दोन गटांमध्ये हाणामारीचा प्रकार घडला. या हाणामारीत २५ लोकांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्याचे काम चालू होते. याप्रकरणात २० ते २५ मोटारसायकली ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार तालुक्यातील शेजबाभुळगाव येथे ग्रामपंचायतीच्या मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर रात्री ७.३०च्या दरम्यान गावात दोन्ही पॅनलच्या गटांमध्ये हाणामारी झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी धावले. याप्रकरणी पोलिसांनी २२ जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच २५ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

याबाबत रात्री उशिरापर्यंत परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्याचे काम चालू होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अशोक सायकर, उपविभागीय अधिकारी प्रभाकर शिंदे हेदेखील घटनास्थळी धावले.

Web Title: Crime against 25 people in Shejbabhulgaon