पांडुरंगाच्या पंढरीत वाढतोय कोरोनाचा संसर्ग; नवे ७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 08:33 AM2020-06-30T08:33:00+5:302020-06-30T08:33:11+5:30

आषाढीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात खळबळ; राजकीय पक्षाच्या अध्यक्षासह बँकेच्या दोन संचालकांनाही कोरोना

Corona infection on the rise in Panduranga; New 7 corona positive patients | पांडुरंगाच्या पंढरीत वाढतोय कोरोनाचा संसर्ग; नवे ७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

पांडुरंगाच्या पंढरीत वाढतोय कोरोनाचा संसर्ग; नवे ७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

Next

पंढरपूर : राज्यातील अनेक जिल्ह्यात व शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत होते. मात्र पंढरपुर नगरी तीन महिन्यापासून या प्रादुर्भावापासून दूर होती. परंतु मागील दोन दिवसा पूर्वी पांडुरंगाच्या पावन नगरीत दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले. तर त्यांच्या संपर्कात आलेले आणखीन सात जणांचा पॉझिटिव असल्याचा अहवाल सोमवारी पहाटे प्राप्त झाला आहे.


पंढरपुरात नव्याने कोरोना पॉझिटिव्ह आढळले रुग्ण कर्मवीर भाऊराव औदुंबर पाटील नगर, जुनी पेठ, नवी पेठ व प्रदक्षिणा मार्गावरील आहेत. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधण्याचे काम प्रशासनामार्फत सुरू करण्यात आले आहे. 

आषाढी यात्रेच्या कालावधीत कोरोना पॉझिटिव्ह  आढळत असल्यामुळे भाविकांसह शहरातील नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Web Title: Corona infection on the rise in Panduranga; New 7 corona positive patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.