शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

शॉर्टकट दर्शन देणाऱ्या पोलिसाला चोप

By admin | Updated: July 8, 2014 01:10 IST

रांगेत घुसखोरीचा प्रयत्न : वारकऱ्यांमध्ये संताप

पंढरपूर : विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ निराळी असते. काही भाविक दिवसभर दर्शन रांगेत थांबून दर्शन घेतात तर काही शॉर्टकट मार्ग शोधतात, परंतु कधी कधी हा मार्ग महागात पडतो, याची प्रचिती रविवारी चक्क पोलीस कर्मचाऱ्याला आली. दर्शन रांगेत स्वत:चे नातेवाईक घुसवण्याचा प्रयत्न केल्याने पोलीस व मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी तर झालीच. याचे रूपांतर मारामारीतही झाले.आषाढी यात्रेसाठी लाखो भाविक पंढरीत येत असतात. प्रत्येक भाविकाला विठ्ठल-रूक्मिणीेचे दर्शन घेण्याची ओढ असते. यामुळे भाविक ७ ते ८ कि. मी. अंतरावरील दर्शन रांगेत थांबतात. या दर्शन रांगेत भाविकांना आषाढी यात्रेत १२ ते १८ तास थांबावे लागते. अंधारात रात्रंदिवस काढून अनेक अडीअडचणीतून विठ्ठलाचे दर्शन घेतात. काही वृद्ध व लवकर दर्शन हवे या भाविकांसाठी विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीने आॅनलाईन बुकिंग सेवा सुरू केली आहे. दर्शन रांगेत कोणी मधून घुसखोरी करू नये, यासाठी मंदिर समितीचे सुरक्षा कर्मचारी त्यांना रोखण्याचे काम करीत आहेत. त्याचबरोबर घुसखोरी होऊन मोठा वाद निर्माण होऊ नये, यासाठी दर्शन रांगेत मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. असे असतानाही पंढरपुरात आषाढी यात्रेच्या बंदोबस्तासाठी आलेले लातूर जिल्ह्यातील लिंबाजी जानकर यांनी रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घरातील सदस्यांना दर्शन मंडपातून रांगेमध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी रांगेत कोणी घुसखोरी करु नये, यासाठी थांबलेल्या मंदिर समितीच्या सुरक्षा कर्मचारी अनिता देवकर व त्या पोलिसात वाद झाला. त्या दोघात एकमेकांना मारहाण झाली. यावेळी त्या ठिकाणी आलेल्या मंदिर समितीचे कर्मचारी सत्यवान घाघरे व तुकाराम राऊत यांच्याबरोबरही त्या पोलीस कर्मचाऱ्याची शिवीगाळ झाली. यावेळी त्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करा अन्यथा मंदिर समितीचे सर्व कर्मचारी कामबंद आंदोलन करणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली, व्यवस्थापक एस. एस. विभुते, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत कदम यांनी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांची समजूत काढून हा वाद मिटविला.