शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
3
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांना भाजपाला इशारा
4
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
5
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
6
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
7
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
8
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
9
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
10
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
11
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
12
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
13
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
14
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
15
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
16
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
17
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
18
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
19
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
20
प्रज्ज्वलचे अश्लील व्हिडीओ कोणी लिक केले ?

 'एक हसतमुख आणि दुसरे देशमुख या दोघांनी महाराष्ट्राची वाट लावली.'

By appasaheb.patil | Published: April 16, 2019 4:00 PM

नितीन गडकरी यांनी सोलापुरातील पार्क मैदानावर आयोजित भाजप संकल्प मेळाव्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारवर जोरदार टिका केली

ठळक मुद्देसोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या प्रचारासाठी आज सोलापुरातील पार्क मैदानावर भाजपचा संकल्प मेळावा देशात पुढील काळात १५ एक्सप्रेस हायवे बांधण्यात येणार - नितीन गडकरी देशात मुंबई ते दिल्ली या मार्गावर १२ लेनचा रस्ता बांधण्यात येणार - नितीन गडकरी

सोलापूर : 'एक हसतमुख आणि दुसरे देशमुख या दोघांनी महाराष्ट्राची वाट लावली.' अशा शब्दात नितीन गडकरी यांनी सुशीलकुमार शिंदे आणि दिवंगत विलासराव देशमुख यांचा नामोल्लेख न करता त्यांच्यावर खोचक टीका केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या प्रचारासाठी आज सोलापुरातील पार्क मैदानावर आयोजित भाजप संकल्प मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आ़ प्रशांत परिचारक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे, लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, शिवाजीराव सावंत, महापौर शोभा बनशेट्टी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, माजी आमदार नरसिंग मेंगजी, इंदिरा कुडक्याल, प्रविण डोंगरे, प्रा़ मोहिनी पत्की, शिवशरण आण्णा पाटील, माजीमंत्री लक्ष्मणराव ढोबळे आदी शिवसेना व भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या सभेमध्ये त्यांनी सुशील कुमार शिंदे यांच्यावर आणि विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. 'म्हातार वयात लोकसभा निवडणुकीसाठी सुशीलकुमार शिंदे कशाला उभे राहिले माहिती नाही' अशा शब्दात नितीन गडकरींनी शिंदेंवर घणाघात केला. याचवेळी मोदी सरकारने चार वर्षात केलेल्या कामगिरीवर भाष्य केले. देशात मुंबई ते दिल्ली या मार्गावर १२ लेनचा रस्ता बांधण्यात येणार आहे. हा जगातील मोठा रस्ता असणार आहे. याशिवाय देशात पुढील काळात १५ एक्सप्रेस हायवे बांधण्यात येणार असल्याचीही माहिती नितीन गडकरी यांनी दिली.

यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरही घणाघात केला. 'मुसलमान, दलित, आदिवासी, शेतकरी, शेतमजूरांची गरिबी हटली का? काँग्रेस पक्षाने गरिबी हटवली, ती कार्यकर्ते, नेते, चेले चपाट्यांची गरिबी हटवली.' असंही नितीन गडकरी म्हणाले.राजकारण हा आमचा धंदा नाही. राष्ट्रनिमार्णाचे प्रभावी उपकरण आहे. पण काँग्रेस-राष्ट्रवादीची अवस्था 'दिल के टुकडे हुए हजार एक यहा गिरा, एक वहा गिरा.' अशी झाली आहे. ७० वषार्चा इतिहास हा बेईमानी आणि गद्दारीचा इतिहास आहे."  अशी टीकाही नितीन गडकरी यांनी केली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेSubhash Deshmukhसुभाष देशमुखVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुखPrashant Paricharakप्रशांत परिचारक