काळ्या फिती लावून मूक मोर्चा

By Admin | Updated: June 16, 2014 01:30 IST2014-06-16T01:30:38+5:302014-06-16T01:30:38+5:30

सर्वपक्षीयांचे निवेदन; मोर्चात सर्वधर्मीयांचा समावेश

Black buckle silent front | काळ्या फिती लावून मूक मोर्चा

काळ्या फिती लावून मूक मोर्चा


कुर्डूवाडी : फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याच्या निषेधार्थ शहरात सर्वपक्षीय व सर्व धर्मीयांनी काळ्या फिती लावून मूक मोर्चा काढला़ मोर्चाचे निवेदन प्रांत कार्यालयात अव्वल कारकून एस. जी. यादव यांनी स्वीकारल्यानंतर हा मोर्चा मागे घेण्यात आला़
गांधी चौक येथून मोर्चास प्रारंभ झाला़ शहरातील प्रमुख मार्गांवरुन जाऊन कुर्डूवाडी पोलीस ठाणे येथेही निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले की, या वृत्तींचा आम्ही निषेध करतो, पोलिसांनी तत्काळ अशा प्रवृत्तीच्या व्यक्तीचा शोध लावून त्याला कडक शासन करावे.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, भाजपाचे जिल्हा उपप्रमुख अरविंद पवार, काँग्रेसचे संजय त्रिंबके, युवक काँग्रेसचे अध्यक्ष वसीम मुलाणी, अ़ भा़ मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप भोरे, मराठा सेवा संघाचे विजयकुमार परबत, बाबाराजे बागल, संजय चव्हाण, आम आदमी पार्टीचे राहुल धोका, सुहास टोणपे, सचिन बागल, माणिक श्रीरामे, राजेंद्र पारखे, शिवाजी गवळी, विजय श्रीरामे, संभाजी सातव, बबलू वाल्मिकी, अल्लाहुसेन शिकलकर, किसन हनवते, भारत साळुंखे, तानाजी जाधव, जगदीश शर्मा, प्रशांत धर्मराज, शिकलकर समाजाचे हमीद शिकलकर आदी उपस्थित होते.
यासाठी माजी नगराध्यक्ष समीर मुलाणी, वाहेद शेख, माजी उपनगराध्यक्ष शकील तांबोळी, हाजी रहिमत बागवान, हाजी सिराज शेख, नगरसेवक लतीब मुलाणी, यासिन बहामद, वलीमहंमद मुलाणी, युसूफ दाळवाले, उमर दारुवाले, फय्याज बागवान, मोहसीन मकनू, प्रा.मिठ्ठूमियाँ शेख, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष शफीक शेख, एम.जी.शेख, अफसर मुलाणी, समद मुलाणी, निहाल शेख, इम्रान पठाण, अय्युब बागवान, इसाक आतार, मैनुद्दीन मुलाणी, अखलाक दाळवाले, जावेद शेख, रियाज शेख, रियाज कुरेशी, शफी कुरेशी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
यावेळी कुर्डूवाडी शहर काँग्रेस कमिटी, भारतीय जनता पार्टी कुर्डूवाडी, काँग्रेस अल्पसंख्याक सेल, जीवनरक्षा संस्था, आम आदमी पार्टी कुर्डूवाडी, शिकलकर समाजासह विविध पक्ष व सामाजिक संघटनांच्या वतीने कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात निषेधपत्र देण्यात आले.
 

Web Title: Black buckle silent front