बीअर आणली होती कुंभारी भागातून आणि बिर्याणी मागवली होती होम डिलिव्हरीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 03:41 PM2020-04-09T15:41:42+5:302020-04-09T15:45:12+5:30

'तो' पोलीस कॉन्स्टेबल अखेर निलंबित; पोलीस गाडीत पार्टी करणं पडलं महागात

The beer was brought from the potter's area and the beer was ordered by the home delivery | बीअर आणली होती कुंभारी भागातून आणि बिर्याणी मागवली होती होम डिलिव्हरीने

बीअर आणली होती कुंभारी भागातून आणि बिर्याणी मागवली होती होम डिलिव्हरीने

Next

सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीत चक्क पोलिस गाडीत बीअर अन् बिर्याणीची पार्टी केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यातील पोलीस कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे चौघांच्या केलेल्या कसून चौकशीत बंद काळात बीअर कुंभारी भागातून आणली तर होम डिलिव्हरी ने बिर्याणी मागण्याची त्यांनी कबुली दिली. 
जेलरोड पोलिस ठाण्याचे पोलिस गाडी बियर आणि बिर्याणीची पार्टी केल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विनोद सूर्यकांत काळे केतन श्रीकांत कसबे राहुल शिंदे, सुमेध वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. बुधवारी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलीस गाडीत पार्टी केल्याप्रकरणी पंडित पोलीस कॉन्स्टेबल विनोद दंतकाळे याच्यावर निलंबनाची कारवाई केली. 
सध्या सर्वत्र संचार बंदी आहे अशा अवस्थेत दोघांना या परिस्थितीत बियर कोठून मिळाली याची माहिती घेण्यात आली आहे ही पियर शहराच्या बाहेर कुंभारी गावाच्या भागातून घेतल्याचे जमले आहे विक्री करणाऱ्या व्यक्तीला पोलीस स्टेशनला चौकशीसाठी बोलावले आहे तपास सुरू आहे आणखीन बऱ्याच बाबी उघडकीस येतील अशी माहिती पोलिस निरीक्षक जे. एन. मोगल यांनी दिली

Web Title: The beer was brought from the potter's area and the beer was ordered by the home delivery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.