शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

गुडेवारांच्या निर्णयाला सत्ताधाऱ्यांचा दणका

By admin | Updated: July 4, 2014 01:31 IST

प्र. परिवहन व्यवस्थापकास हटविले : पदभार जावळेंकडे

सोलापूर : महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी अधिकाराचा वापर करून तात्पुरत्या स्वरुपात नियुक्त केलेले परिवहन व्यवस्थापक प्रदीप खोबरे यांना पदमुक्त करुन परिवहनचा पदभार सहायक आयुक्त पंकज जावळे यांच्याकडे देण्याचा निर्णय गुरूवारी झालेल्या महापालिकेच्या सभेत बहुमताने घेण्यात आला.महापालिकेची ५ मे रोजी तहकूब झालेली सभा महापौर अलका राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी परिवहनचा गाडा सुरळीत चालावा म्हणून राज्य परिवहन महामंडळातून निवृत्त झालेले प्रदीप खोबरे यांची तात्पुरत्या स्वरूपात मानधनावर नियुक्ती केली होती. या नियुक्तीचा विषय सभागृह नेते महेश कोठे यांनी सभागृहापुढे मांडला. आयुक्तांनी तात्पुरत्या स्वरूपात परिवहन व्यवस्थापक नियुक्त करताना चुकीच्या पद्धतीचा अवलंब केला. वास्तविक हे पद नेमण्याचा आयुक्तांना अधिकार नाही. त्यामुळे प्रभारी परिवहन व्यवस्थापक प्रदीप खोबरे यांना पदमुक्त करून त्यांच्या जागी नवीन पद कायमस्वरूपी भरावे. तोपर्यंत पठाण यांच्याकडे पदभार द्यावा. नवीन बस खरेदीचा विषय सभागृहाच्या मान्यतेने व्हावा अशी सूचना मांडली. जगदीश पाटील यांनी सूचनेला मान्यता दिल्यावर अ‍ॅड. यु. एन. बेरिया उठले व त्यांनी विरोधकांच्या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त करून परिवहन व्यवस्थापक नियुक्तीचा महापालिका आयुक्तांना अधिकार आहे काय? असा मुद्दा उपस्थित केला. त्यावर जगदीश पाटील यांनी परिवहनची स्थिती वाईट आहे. परिवहनचा गाडा सुरळीत चालावा म्हणून विषयाला मान्यता दिली असा खुलासा केला. मात्र आनंद चंदनशिवे यांनी बेरिया यांच्या आरोपाला आक्षेप घेतला. खोबरे यांची नियुक्ती बेकायदेशीर नाही. त्यांनी हा विषय परिवहन समितीसमोर आणलेला आहे असे निदर्शनाला आणून दिले. त्यावर कोठे यांनी परिवहनमध्ये चाललेल्या अनेक बेकायदेशीर बाबी चव्हाट्यावर आणल्या. नवीन बस येणार म्हणून प्रभारी व्यवस्थापकाने चालकाची भरती सुरू केली आहे. दोन पदे निर्माण केली. वाल्व्हो बस परवडत नाही म्हणून मी आधीच सांगितले होते. असे असतानाही आयुक्त गुडेवार यांनी बस खरेदीसाठी सभागृहाची परवानगी न घेता महापालिकेच्या तिजोरीतून आठ कोटी परस्पर घेतले, असे निदर्शनाला आणून दिले.--------------थीम पार्कला मंजुरीकेगाव येथील शिवाजीनगरात केंद्र व राज्य शासनाच्या अनुदानातून उभारण्यात येणाऱ्या १00 कोटी खर्चाच्या थीम पार्क व अ‍ॅम्युजमेंट पार्कची योजना राबविण्यास मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पाचा अहवाल तयार करण्यासाठी तांत्रिक सल्लागार म्हणून पुण्यातील सायन्स अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजीस मान्यता देण्यात आली.------------------गुडेवारांना विरोध नाहीसभेत सभागृह नेते महेश कोठे, अ‍ॅड. यु. एन. बेरिया यांनी गुडेवारांची आम्ही बदली केली नाही व त्यांना विरोधही नाही. त्यांनी पुन्हा येऊन काम करावे. पण मनमानी व बेकायदेशीर बाबींचा अंमल आम्ही खपवून घेणार नाही. कामकाज कायद्याप्रमाणेच झाले पाहिजे, असा आमचा आग्रह असल्याचे ठासून सांगितले.------------------------एलबीटीचे काय झाले...जीवनावश्यक अन्नधान्य व कडधान्य, तेलबियांना एलबीटीतून सूट देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. यावर चर्चा करताना महापौर अलका राठोड यांनी व्यापाऱ्यांच्या बैठकीत जाणून घेतलेल्या मतांवरून एलबीटी, जकात हटवून महापालिकेच्या हिताचा निर्णय घ्यावा, असा अहवाल मुख्यमंत्र्यांना दिल्याचे सांगितले.