शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

बाळे मालधक्का सुनासुना !

By admin | Updated: June 11, 2014 00:45 IST

हुंडेकऱ्यांचा संप : सहा कोटींची उलाढाल ठप्प

सोलापूर : वेळेत सिमेंट, धान्य उतरवून न घेतल्यास रेल्वे प्रशासनाकडून आकारण्यात येणाऱ्या सहापट दंडाच्या रकमेचा निर्णय मागे घ्यावा, या प्रमुख मागणीसाठी सोलापूर हुंडेकरी असोसिएशनने बेमुदत बंद पुकारला असून, जम्बो सायडिंग आणि रेल्वे मालधक्का ओस पडला आहे. सहा दिवसांमध्ये सुमारे सहा ते साडेसहा कोटी रूपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. रेल्वे प्रशासन आणि हुंडेकऱ्यांच्या वादात माथाडी कामगार, ट्रकचालक, क्लिनरवर उपासमारीची वेळ आली आहे. सोलापूर रेल्वे स्थानकाच्या मागे असलेल्या जम्बो सायडिंगवर ५५ हजार पोत्यांचे लोडिंग होते. तेवढ्याच पोती बाळे मालधक्क्यावर येत असतात. सिमेंट घेऊन एखादी गाडी आल्यास ती रिकामी करून घेण्यासाठी हुंडेकऱ्यांना ९ तासांची मुदत असते. कधी-कधी काही मालगाड्या सायंकाळी दाखल होत असतात. माथाडी कायद्याप्रमाणे सायंकाळी ६ वाजता मालधक्क्यावरील कामकाज बंद होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी लोडिंग करून घ्यावी लागते. ९ तासांची मुदत संपून जाते. दुसऱ्या दिवशी तासाप्रमाणे वारपेज, डॅम्ब्रेजच्या नावाखाली सहापट दंड आकारला जातो. याबाबत सोलापूर हुंडेकरी असोसिएशनने सातत्याने रेल्वे प्रशासनाला पत्र देऊनही हुंडेकऱ्यांचा हा प्रमुख प्रश्न मिटला नाही. सहापट दंडात्मक कारवाईची अट मागे घेण्यासाठी राज्यातील ६१ मालधक्के बंद आहेत. दरम्यान, उद्या (शनिवारी) पुण्यात राज्य हुंडेकरी असोसिएशनची बैठक होत असून, या बैठकीत हा प्रश्न चर्चिला जाणार आहे. सोलापूर हुंडेकरी असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश मुनाळे, सचिव बाबुराव घुगे उपस्थित राहणार आहेत.--------------------------------७०० कामगार संकटातजम्बो सायडिंग आणि नव्याने सुरु करण्यात आलेल्या बाळे मालधक्क्यावर सुमारे ७०० ते ७५० माथाडी कामगार आहेत. दररोज काम केल्याशिवाय या कामगारांना गत्यंतर नसते. दोन्ही मालधक्के बंद असल्यामुळे माथाडी कामगारांना बसून रहावे लागत आहे. माथाडी कामगारांशिवाय ट्रकचालक, क्लिनर यांच्याही रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.------------------------------रेल्वे मंत्रालयाचा मनमानी कारभार सुरू आहे. एकीकडे सोलापूर भकास होत असताना दुसरीकडे हुंडेकरी व्यवसायाला खीळ घालण्याचा प्रकार होत आहे. माथाडी कामगारांसह अनेकांना रोजगार देणाऱ्या या व्यवसायातील हुंडेकऱ्यांना दिलासा मिळण्याची गरज आहे.- बाबुराव घुगेसचिव- सोलापूर हुंडेकरी