बाप रे...फास्टॅगच्या खात्यावर पैसै असतानाही भरावा लागतोय वाहनधारकांना दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 04:55 PM2021-02-22T16:55:32+5:302021-02-22T20:20:20+5:30

Fastag Not Scanned, double toll taken: प्रवाशांना मनस्ताप : टोल कंपन्यांच्या तांत्रिक चुकीचा प्रवाशांना फटका

Baap re ... Vehicle owners have to pay fines even though there is money in Fastag's account | बाप रे...फास्टॅगच्या खात्यावर पैसै असतानाही भरावा लागतोय वाहनधारकांना दंड

बाप रे...फास्टॅगच्या खात्यावर पैसै असतानाही भरावा लागतोय वाहनधारकांना दंड

Next

सोलापूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) १५ फेब्रुवारीपासून सर्व टोल प्लाझावर फास्टॅग अनिवार्य केला आहे. फास्टॅग संलग्नित खात्यावर पैसे असतानाही टोल कंपन्यांच्या तांत्रिक चुकीमुळे प्रवाशांना दंड भरावा लागत आहे. याचा प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. (Fastag Not Scanned, double toll taken on Solapur highway.)

टोल प्लाझावर वाहनांच्या लागणाऱ्या रांगापासून सुटका करण्यासाठी फास्टॅग ही योजना आणण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात यात तांत्रिक अडचणी येत असल्याने पूर्वीसारखाच वेळ जात असल्याचे काहींचा अनुभव आहे. सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. इरेश स्वामी हे १६ फेब्रुवारी रोजी पुण्याहून सोलापूरला येत होते. वरवडे टोलनाका येथे आले असताना त्यांच्या गाडीला असलेला फास्टॅग स्कॅन करण्यात आला. त्यावेळी डॉ. स्वामी यांच्या फास्टॅग संलग्नित खात्यामध्ये पैसे असतानाही टोलनाक्याच्या यंत्रणेत ते दर्शवित नव्हते. त्यामुळे त्यांच्याकडून टोल व फास्टॅग संलग्नित अकाउंटमध्ये पैसे नसल्याचे सांगून दंडही वसूल करण्यात आला. या प्रकारचा अनुभव त्यांना सावळेश्वर येथील टोलनाक्यावर आला असल्याचे डॉ. स्वामी यांनी सांगितले.

याची झेरॉक्स ठेवा! खात्यात पैसे आहेत, पण FASTag स्कॅन झाला नाही, टोलनाक्यावरून फुकटात जा...

प्रत्यक्षात कमी वेळेमध्ये महामार्गावरून जाण्यासाठी उभारलेल्या यंत्रणेमुळे अधिक उशीर होत आहे. स्कॅन करण्यासाठी जे अद्ययावत तंत्रज्ञान असायला हवे ते तंत्रज्ञान टोलनाक्यांकडे असल्याचे दिसत नाही. वाहन दरवेळी टोलनाक्यावर आल्यानंतर स्कॅन करण्यासाठी पुढे-मागे करावे लागते. यासाठी वेळ तर जातोच. स्कॅन न झाल्यास प्रवाशांना दंड भरावा लागतो. टोल नाक्यावरील कर्मचारी हे अरेरावीचा भाषा करतात, असा अनुभव आल्याचे प्रवाशांनी सांगितले.

FASTag problems: टोल दोनदा कापला तर काय? FASTag बाबत अद्याप न पडलेले प्रश्न...

फास्टॅग संलग्नित खात्यावर पैसे असूनही टोल कंपनीच्या तृटीमुळे मला नाक्यावर अडवून दंडासह पैसे वसूल केले. तिथे असलेल्या बँकेच्या कर्मचाऱ्याने खात्यात पुरेसे पैसे असल्याचे सांगितले तरी टोल नाक्यावरील कामगाराने ऐकले नाही. कारमध्ये माझ्या कुटुंबीयांना आणि मला मनस्ताप झाला. ही व्यवस्था जनतेच्या हितासाठी आहे का जनतेला लुटण्यासाठी आहे हे कळत नाही. ही लूटमार थांबवावी.

- डॉ. इरेश स्वामी, माजी कुलगुरू, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर

टोल कंपन्यांची चूक असताना प्रवाशांकडून दंड वसूल करण्याचे प्रकार आधीही घडले आहेत. तसेच टोलनाक्यावर उद्धटपणे वागून अरेरावीची भाषा वापरली जाते. यासंबंधीची तक्रार मी मंत्रालयातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. टोलनाक्यावर टोल देण्यासाठी उशीर होत असेल तर प्रवाशांना टोल न देताही जाण्याचा अधिकार आहे. तसे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

- मिलिंद भोसले, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अभियंता संघटना आणि कंत्राटदार महासंघ

एकच FASTag दोन गाड्यांना वापरता येतो? जाणून घ्या तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे

Web Title: Baap re ... Vehicle owners have to pay fines even though there is money in Fastag's account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.