सीमा खारे यांना आदर्श महिला सरपंच पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:22 AM2021-03-08T04:22:12+5:302021-03-08T04:22:12+5:30

: सोलापूर जिल्हा सरपंच परिषदेच्या वतीने म्हैसगाव येथील सरपंच सीमा खारे यांचा आदर्श महिला सरपंच पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात ...

Awarding Adarsh Mahila Sarpanch Award to Seema Khare | सीमा खारे यांना आदर्श महिला सरपंच पुरस्कार प्रदान

सीमा खारे यांना आदर्श महिला सरपंच पुरस्कार प्रदान

Next

: सोलापूर जिल्हा सरपंच परिषदेच्या वतीने म्हैसगाव येथील सरपंच सीमा खारे यांचा आदर्श महिला सरपंच पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. झेडपीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील व झेडपी सदस्य रेखा राऊत यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला.

अध्यक्षस्थानी सरपंच परिषदेचे सरचिटणीस ॲड. विकास जाधव होते. यावेळी आदिनाथ देशमुख, कविता घोडके, पंडित खारे उपस्थित होते. सरपंच सीमा खारे यांना सन्मानित केल्याबद्दल आ. संजयमामा शिंदे, विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन वामन उबाळे, झेडपी सदस्य शुभांगी उबाळे, आप्पासाहेब उबाळे यांनी कौतुक केले.

फोटो

०७कुर्डूवाडी-सत्कार

ओळी

म्हैसगाव सरपंच सीमा खारे यांचा आदर्श सरपंच पुरस्कार देऊन सन्मानित करताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, रेखा राऊत, ॲड. विकास जाधव आदी.

Web Title: Awarding Adarsh Mahila Sarpanch Award to Seema Khare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.