शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

तुकोबारायांचे जिल्ह्यात आगमन

By admin | Updated: July 5, 2014 00:29 IST

रिंगण सोहळा रंगला; अकलूजच्या मुक्कामी दर्शनासाठी भाविकांची गर्दी

अकलूज : टाळ मृदंगाच्या गजरात ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयजयकारात देहूच्या वाड्यावरून आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आज आगमन झाले असून जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखी सोहळ्याचे जोरदार स्वागत करण्यात केले. सोहळ्याचे अकलूज येथे गोल रिंगण होऊन पालखी सोहळा अकलूज मुक्कामी विसावला.देहू ते पंढरपूर असा प्रवास मजल-दरमजल करीत जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने पुणे जिल्ह्यातील सराटी येथील मुक्काम आटोपून आज सोलापूर-पुणे जिल्ह्याची सरहद्द नीरा नदी ओलांडून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. जिल्ह्यात प्रवेश करताच तोफांच्या सलामीत जिल्हा सरहद्दीवर जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप सोपल, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हा पोलीस प्रमुख मकरंद रानडे, जि.प. अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, माजी अध्यक्ष मदनसिंह मोहिते-पाटील, आ. हणमंत डोळस, सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू एन.एन. मालदार, मुख्य कार्यकारी अधिकारी राजाराम झेंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय भिलारे, प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, तहसीलदार विजय पाटील, जि.प. सदस्य मोहनराव लोंढे यांनी पालखी व अश्वाचे पुष्पहार घालून स्वागत केले. तत्पूर्वी पालखी सोहळ्याने सराटीकरांचा निरोप घेण्यापूर्वी नीरा नदीच्या पात्रातील पाण्यात पालखीच्या अश्वांना व पादुकांना स्रान घालण्यात आले.जिल्ह्यात पालखी सोहळ्याने प्रवेश करून अकलूज (ता. माळशिरस) शहरात प्रवेश करताना गांधी चौकात खा. विजयसिंह मोहिते-पाटील, नंदिनीदेवी मोहिते-पाटील, माजी जि.प. अध्यक्ष फत्तेसिंह माने-पाटील, माजी सरपंच किशोरसिंह माने-पाटील, पं.स. सदस्य पांडुरंग देशमुख, पांडुरंगराव देशमुख, फातिमा पाटावाला, सरपंच शशिकला भरते व ग्रामपंचायत सदस्यांनी सोहळ्याचे स्वागत केले.सदाशिवराव माने विद्यालयातील रिंगण सोहळ्यात अश्व धावण्यापूर्वी झेंडेधारी वारकरी, तुळशी डोक्यावर घेतलेल्या महिला वारकरी, विणेकरी, पखवाज वादक यांनी रिंगण सोहळ्यास प्रदक्षिणा मारल्यानंतर यंदा प्रथमच पालकमंत्री दिलीप सोपल, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, आ. हणमंत डोळस, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी राजाराम झेंडे, जि.प. अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी हे रिंगण सोहळ्यात धावले. ---------------------------------गैरसमजामुळे घडले...अश्व बाहेर काढण्याच्या घटनेवर प्रतापसिंह मोहिते - पाटील म्हणाले, माझा अश्व जाणीवपूर्वक राजकीय आकसापोटी बाहेर काढला तर जयसिंह मोहिते - पाटील म्हणाले, तो अश्व पूजा केल्यानंतर घोडेस्वार स्वत:च बाहेर घेऊन गेले. पालखी सोहळा प्रमुखांनी तर प्रतापसिंहांचा अश्व बाहेर जाणे हा प्रकार गैरसमजावरून झालेला आहे.----------------------------‘त्या’ अश्वाने रिंगण केलेच नाहीअकलूजमध्ये आज श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ््यातील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या गोल रिंगणात ३0 वर्षे धावणारा प्रतापसिंह मोहिते—पाटील यांचा अश्व रिंगण न करताच निघून गेला. पालखी सोहळ््यातील ही घटना चर्चेचा विषय ठरली.