शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

कांदा अनुदानासाठी सोलापूर जिल्ह्यातील २३ हजार शेतकºयांनी केले अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2019 1:24 PM

सोलापूर : दीड महिन्यात जिल्ह्यातील ५५ हजार शेतकºयांनी जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याची विक्री केली असली तरी अनुदानासाठी सुमारे ...

ठळक मुद्देरकमेसाठी पात्र ठरले केवळ साडेआठ हजार उत्पादकआठ कोटी रुपये मिळतील; दीड महिन्यात ५५ हजार शेतकºयांनी कांदा विक्री केला होतासातबाºयावर कांद्याची नोंद असलेल्या व एका शेतकºयाला किमान २०० क्विंटलपर्यंत अनुदान मिळणार

सोलापूर : दीड महिन्यात जिल्ह्यातील ५५ हजार शेतकºयांनी जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याची विक्री केली असली तरी अनुदानासाठी सुमारे २३ हजार शेतकºयांनी अर्ज केले होते. त्यातील केवळ ८ हजार  ७६९ शेतकºयांचेच अर्ज पात्र ठरले आहेत. जिल्हाभरातील शेतकºयांना ८ कोटी ८ लाख ३५ हजार १७४ रुपये अनुदान मागणी केले जाणार आहे.

राज्यात कांद्याचे दर घसरल्याने राज्य शासनाने प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. एक नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत कांद्याची विक्री झालेल्या शेतकºयांना अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले होते. सोलापूर बाजार समितीमध्ये ४९ हजार ९०९ व अन्य बाजार समित्यांमध्ये असा एकूण ५५ हजार शेतकºयांनी कांदा विक्री केल्याची माहिती बाजार समित्यांनी शासनाला पाठविली होती.

त्यानंतर प्रत्यक्षात अर्ज मागविण्यात आल्यानंतर अनुदान मागणी अर्ज फारच कमी आहे, सोलापूर बाजार समितीमध्ये अवघे १६ हजार ९४० तर अन्य बाजार समित्यांमध्ये ६ हजार अर्ज शेतकºयांनी केले होते. त्याची तपासणी करण्यात आली. यामध्ये सोलापूर बाजार समितीचे ८ हजार ५७८ शेतकरी अनुदानास पात्र ठरले. कुर्डूवाडी, पंढरपूर, बार्शी,करमाळा, मंगळवेढा अकलूज बाजार समित्यांचे केवळ १९१ शेतकरी पात्र ठरले.

सोलापूर बाजार समितीच्या ८ हजार ५७८ शेतकºयांचा अनुदानासाठी ३ लाख ९७ हजार ४१८ क्विंटल ४७२ किलो कांदा पात्र झाला. ७ कोटी ९८ लाख ९९ हजार ११० रुपये इतकी रक्कम अनुदानासाठी मिळणार आहे. अन्य बाजार समित्यांना १९१ शेतकºयांसाठी ४ हजार ६८० क्विंटल कांद्यासाठी ९ लाख ३६ हजार ६४ रुपये अनुदान मिळणार आहे. हे पात्र अर्ज व ही रक्कम केवळ सातबारा उताºयावर कांद्याची नोंद असलेल्या शेतकºयांना मिळणार आहे.

अवघे १९१ शेतकरी पात्रजिल्ह्यातील सोलापूर वगळता ७ बाजार समित्यांमध्ये  अनुदानासाठी दाखल झालेल्यांपैकी केवळ १९१ शेतकरी अनुदानाला पात्र ठरले आहेत. या बाजार समित्यांमध्ये ५ हजारांहून अधिक शेतकºयांनी कांदा विक्री केला होता. तर अनुदानासाठी आलेल्या अर्जामध्ये तलाठ्यांनी दाखला दिलेल्या शेतकºयांची संख्या ३८९ आहे. उर्वरित अर्ज अनुदानासाठी अपात्र झाले असल्याचे सांगण्यात आले. 

सातबाºयावर कांद्याची नोंद असलेल्या व एका शेतकºयाला किमान २०० क्विंटलपर्यंत अनुदान मिळणार आहे. सातबाºयावर कांद्याची नोंद नाही परंतु  तलाठ्याचा दाखला असलेल्याची माहिती कळविण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्याप्रमाणे शासन निर्णय आल्यानंतर त्यांनाही अनुदान मिळेल.- अविनाश देशमुख जिल्हा उपनिबंधक सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीSubhash Deshmukhसुभाष देशमुखonionकांदाFarmerशेतकरी