Solapur Crime News: ओळखीच्याच व्यक्तीने एका तरुणीला बळजबरी दुचाकीवर बसवून नेले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केले. आरोपी इथेच थांबला नाही, तर त्याने तिला दोन दिवस डांबून ठेवले. त्यानंतर दुसऱ्या गावात भाड्याच्या घरात ठेवून नंतर आरोपी फरार झाला. तरुणी घरी परतल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. अक्कलकोट तालुक्यात ही घटना घडली असून, याप्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय पीडित महिला ही २४ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी घराबाहेर शेळ्यांना पाणी पाजत असताना, ओळखीच्या व्यक्तीसह आलेल्या आरोपींनी तिला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून पळवून नेले. तिला शेतातील घरात नेऊन मुख्य आरोपीने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला गेला आहे.
घटनेनंतर आरोपीने पीडितेला धमकावून दोन दिवस संबंधित ठिकाणी ठेवले. त्यानंतर तिला दुसऱ्या गावात भाड्याच्या घरात ठेवून आरोपी फरार झाला. काही दिवसांनी पीडित महिला गावी परतल्यानंतर तिने संपूर्ण प्रकार कुटुंबीयांना सांगितला.
कुटुंबीयांनी आरोपींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी टाळाटाळ केल्याने अखेर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी सातप्पा गद्दे, त्याचा भाऊ दौलप्पा व शिवप्पा गद्दे, काशप्पा कलमोडी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Summary : In Akkalkot, a woman was abducted and sexually assaulted by an acquaintance and accomplices. She was held captive for two days before being moved to another village. Police have registered a case against five individuals involved in the crime.
Web Summary : अक्कलकोट में, एक महिला का अपहरण कर एक परिचित और उसके साथियों ने यौन उत्पीड़न किया। उसे दो दिनों तक बंधक बनाकर रखा गया और फिर दूसरे गाँव में ले जाया गया। पुलिस ने अपराध में शामिल पाँच लोगों के खिलाफ मामला दर्ज किया है।