शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
14
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
15
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
16
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
17
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
18
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
19
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
20
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा

तोकडे कपडे घालून अश्लील नृत्य करणाºया १२ बारबालांवर सोलापुरात कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 12:32 PM

आॅर्केस्ट्रा बारमध्ये डान्सबार; हत्तूरच्या ‘कलवरी’वर कारवाई : ३७ जणांविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठळक मुद्दे शासनाने घालून दिलेल्या नियम व अटंींचे उल्लंघन करून डान्सबार चालवला जात होतायापूर्वी केगाव येथील एका डान्सबारची परवानगी रद्द करण्यात आली कलवरी डान्सबारचाही परवाना रद्द करण्यासाठीचा अहवाल लवकरच जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला जाणार

सोलापूर : विजापूर रोडवरील हत्तूर नजीक असलेल्या कलवरी डान्सबारमध्ये धाड टाकून तोकडे कपडे घालून अश्लील नृत्य करणाºया बारबालेसह ३७ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी मध्यरात्री १२.३0 वाजता गुन्हे शाखेच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे. 

डान्सबारचे परवानाधारक तानाजी लकडे (रा. विजापूर रोड), मॅनेजर शरणबसप्पा बनशेट्टी (वय ३३, रा. हुदलुर, ता. आळंद), कामगार आकाश माळशिकारे (वय २५, रा. वडकबाळ, ता. दक्षिण सोलापूर), अमर शरणप्पा शिवशरण (वय २0, रा. वडकबाळ, ता. दक्षिण सोलापूर), राजरतन वाघमारे (वय १९, रा. वडकबाळ), अनिल राठोड (वय २0, रा. रेणुकानगर, जुळे सोलापूर), महेश होदलुरे (वय २0, रा. सुथनर, ता. आळंद, जि. गुलबर्गा), रवी प्रकाश निकम (वय ३४, रा. जय बजरंगनगर, होटगी रोड), ग्राहक चेतन खोबरे (रा. भवानी पेठ, घोंगडे वस्ती), संतोष जवळे (रा. रामलिंगनगर आयटीआयच्या पाठीमागे), प्रफुल्ल क्षीरसागर (रा. आदित्यनगर विजापूर नाका), विनायक विभूते (रा. गुरूवार पेठ), शिवकुमार शिंगाडे (रा. शेळगी पोलीस चौकी समोर करंजकर सोसायटी), योगेश दिंडोरे (रा. मठ गल्ली होटगी), मनोज गुरव (रा. रेणुका नगर जुळे सोलापूर), आनंद गायकवाड (रा. अभिमानश्री नगर), कबीर जमादार (रा. रिद्देवाडी, ता. अक्कलकोट), निलेश जाधव (रा. सलगरवस्ती), राहुल गायकवाड (रा. अवंती नगर), लखन कांबळे (रा. नंदूर ता. उत्तर सोलापूर) व १२ बारबाला अशा एकूण ३७ जणांवर कारवाई करण्यात आली. 

ही कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) बापू बांगर, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय जगताप, सहायक पोलीस निरीक्षक अजित कुंभार, सचिन बंडगर, पोलीस कॉन्स्टेबल सनी राठोड, गणेश शिंदे, अश्रुभान दुधाळ, सूरज देशमुख, दत्तात्रय कोळेकर, महिला पोलीस नाईक विद्या डोळसे, सुनीता जाधव, पोलीस नाईक विजय निंबाळकर, चालक सरफराज शेख, संजय काकडे, प्रफुल्ल गायकवाड यांनी पार पाडली. 

ग्राहक नर्तिकेच्या अंगावर उधळत होते नोटा- गुन्हे शाखेच्या पोलिसांनी करवरी डान्सबारमध्ये धाड टाकली असता, १४ नर्तिका अंगावर तोकडे कपडे घालून बिभत्सपणे हावभाव करीत होत्या. ग्राहक नर्तिकेच्या अंगावर दहा रूपयांच्या बनावट नोटा उधळत होते. डान्सबारमध्ये काही ग्राहक मद्यप्राशन करीत होते, शासनाने घालून दिलेल्या नियम, अटी व शर्तीचे उल्लंघन केल्याचे दिसून आले. या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

परवाना रद्द करण्यासाठी अहवाल पाठवणार : डोंगरे- शासनाने घालून दिलेल्या नियम व अटंींचे उल्लंघन करून डान्सबार चालवला जात होता. अशाच प्रकारच्या कारवाईत यापूर्वी केगाव येथील एका डान्सबारची परवानगी रद्द करण्यात आली आहे. कलवरी डान्सबारचाही परवाना रद्द करण्यासाठीचा अहवाल लवकरच जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला जाणार आहे अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) अभय डोंगरे यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

टॅग्स :Solapurसोलापूरdanceनृत्यSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसCrime Newsगुन्हेगारी