पंढरपूर-देगावजवळ अपघात; भाविकाचा मृत्यू, एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 12:16 IST2018-10-25T12:14:56+5:302018-10-25T12:16:21+5:30

पंढरपूर :- तुळजापूर येथे देवीच्या दर्शनावरुन येणाºया भाविकांच्या वाहनाला शहराजवळच्या पंढरपूर - सोलापूर रोड तांबोळी वस्ती येथे झालेल्या अपघातात ...

Accident near Pandharpur-Bende; The death of the devotee, one injured | पंढरपूर-देगावजवळ अपघात; भाविकाचा मृत्यू, एक जखमी

पंढरपूर-देगावजवळ अपघात; भाविकाचा मृत्यू, एक जखमी

ठळक मुद्दे- आज पहाटे ३ वाजता झाला अपघात- शाम खबाणे या भाविकाचा मृत्यू- तुळजापूर येथे देवीच्या दर्शनावरून येणाºया भाविकावर काळाचा घाला

पंढरपूर :- तुळजापूर येथे देवीच्या दर्शनावरुन येणाºया भाविकांच्या वाहनाला शहराजवळच्या पंढरपूर-सोलापूर रोड तांबोळी वस्ती येथे झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात गुरूवारी पहाटे ३ सुमारास हा अपघात झाला.

शाम रमेश खबाणे (वय- ३५ रा. कालिकादेवी चौक, पंढरपूर) हा युवक जागीच ठार झाला तर आनंद अशोक घोडके ( वय ३६ रा. नागपुरकर मठाजवळ, घोडके वाडा,पंढरपूर) हा युवक गंभीर जखमी झाला आहे.

घोडकेचे दोन्ही पाय तुटल्याची माहिती पुढे येत आहे. हे दोन युवक नवरात्री निमित्ताने तुळजापूरला देवीच्या दर्शनाला गेले होते. दर्शनावरुन येताना परतीचा प्रवासात पंढरपूर शहराजवळ आले असता त्यांची कार झाडावर आदळली. यामध्ये शाम खबाणे जागीच ठार झाले.


 

Web Title: Accident near Pandharpur-Bende; The death of the devotee, one injured