शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

मोहोळ शौचालय घोटाळ्यात ९ कर्मचारी निलंबित

By admin | Updated: June 4, 2014 00:24 IST

मास्टर मार्इंड हजरत शेख याचाही समावेश

सोलापूर: मोहोळ शौचालय घोटाळ्याला जबाबदार धरुन घोटाळ्याला मास्टर मार्इंड हजरत शेखसह ९ कर्मचार्‍यांना जिल्हा परिषदेने निलंबित केले आहे. अलीकडच्या दोन वर्षातील मोठा घोटाळा जिल्हा परिषद कर्मचार्‍यांनी केला आहे. निर्मल भारत अभियानांतर्गत शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहन म्हणून दिल्या जाणार्‍या अनुदानावर जिल्हा परिषदेच्या कर्मचार्‍यांनीच डल्ला मारला आहे. एकाच लाभार्थ्याच्या नावावर अनेक वेळा धनादेश काढून ती रक्कम हडप केली आहे. क्रॉस चेक न काढता बेअरर धनादेश काढणे तसेच लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा न करता परस्पर रक्कम उचलली आहे. गैरप्रकार करण्यासाठी सहकार्य करणार्‍या प्रमुखांवर जिल्हा परिषद प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली असून पोलिसात गुन्हाही दाखल होणार आहे. शौचालय अनुदान हडप करणार्‍या या प्रकरणाचा मास्टर मार्इंड हजरत इब्राहिम शेख याला निलंबित केले आहे. शेख हा जिल्हा परिषद शाळेचा शिक्षक असून स्वच्छतादूत म्हणून काम पाहत होता. तत्कालीन प्रभारी गटविकास अधिकारी (सध्या मोहोळ येथे कार्यरत कृषी अधिकारी) एस. एन. मिरगणे, लेखा विभागाचे सहायक लेखाधिकारी फुलसिंग चव्हाण, कनिष्ठ सहायक जी. आर. कांबळे, विस्तार अधिकारी एच. ए. गायकवाड, स्वाती गायकवाड, समाधान जाधव (ग्रामसेवक वाफळे), नित्यानंद कुलकर्णी (ग्रामसेवक सौंदणे), कनिष्ठ सहायक एम. बी. पठाण यांना निलंबित करण्यात आले आहे. तत्कालीन गटविकास अधिकारी बिपीन इंगळे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली असून, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.

-----------------

नियोजन करुनच घोटाळा

नियमाचा कसलाही आधार न घेता सभापती पुत्र समीर गायकवाड याची स्वच्छतादूत म्हणून नियुक्ती केली होती. चुकीच्या पद्धतीने नियुक्ती व काही गावात प्रबोधन केल्याचे दाखवून गायकवाड याने मानधन उचलले आहे. एकूणच नियोजन करुन गैरप्रकार केल्याचे यावरुन स्पष्ट झाले आहे.