शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
3
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
4
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
6
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
7
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
8
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
9
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
10
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
11
"आमिर खानच्या प्रोडक्शनमधून ऑडिशनसाठी फोन आला आणि...", नम्रता संभेरावने सांगितला 'तो' किस्सा
12
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
13
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
14
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
15
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
16
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
17
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
18
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
19
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
20
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर

कुंभारीच्या माळरानावर तयार होते दररोज ५०० लिटर विषारी ताडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 12:56 PM

माफियांचा सुळसुळाट; पहाटे चार ते सहादरम्यान शहराच्या विविध भागांत वितरण

ठळक मुद्देसोलापुरात अधिकृत ताडी विक्री केंद्रांना बंदी आहे गल्लोगल्ली क्लोरल हायड्रेट मिश्रित विषारी ताडीची विक्री जोरातक्लोरल हायड्रेट ही विषारी पावडर परप्रांतातून आणली जाते

सोलापूर : समाजसेवेची शाल पांघरलेला ‘प्रहार’ प्रतिनिधी कुंभारीच्या माळरानावर विषारी ताडी तयार करतोय. बेकायदा विषारी ताडीचा काळा धंदा सध्या जोरात असून, कुंभारीच्या एका शेतात दररोज बनणारी ५०० लिटर ताडी पहाटे चार ते सहादरम्यान वितरित होते. यात मोठी यंत्रणा गुपचूपपणे काम करते. हे सर्व पोलिसांच्या वरदहस्ताने चालते, अशी माहिती गोदुताई विडी घरकूल परिसरातील नागरिकांनी ‘लोकमत’ला दिली.

गोदुताई विडी घरकूल परिसरात ताडीची निर्मिती करणाºया एका कथित पुढाºयाने दोन ते तीन घरे भाड्याने घेतली आहेत. या खोल्यांमध्ये तो ताडी निर्मितीचे साहित्य ठेवतो. मध्यरात्रीनंतर त्याची ताडी निर्मिती प्रक्रिया सुरू होते. अशीच काहीशी प्रक्रिया शहराच्या विविध भागात चालते.

सोलापुरात अधिकृत ताडी विक्री केंद्रांना बंदी आहे. त्यामुळे गल्लोगल्ली क्लोरल हायड्रेट मिश्रित विषारी ताडीची विक्री जोरात सुरू आहे. क्लोरल हायड्रेट ही विषारी पावडर परप्रांतातून आणली जाते. याचे धागेदोरे कर्नाटक ते आंध्रप्रदेशापर्यंत विणले गेले आहेत. सोलापूर शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात विषारी ताडीची विक्री सुरू आहे. विशेष करून गोदुताई विडी घरकूल येथील ‘अ’ गट परिसरात ताडी विक्री होते. यासोबत जुनी विडी घरकूल परिसर, नीलमनगर, अशोक चौक, सत्तर फूट रोड परिसर, गेंट्याल चौक, बापूजीनगर, कन्ना चौक, घोंगडे वस्ती, भवानीपेठ या परिसरात मोठ्या प्रमाणात विषारी ताडीची विक्री सुरू आहे.

पोलीस यंत्रणेचा पूर्ण सहभाग : आडमअधिक माहिती देताना माजी आमदार नरसय्या आडम यांनी सांगितले, कुंभारी येथील गोदुताई विडी घरकूल परिसरात मोठ्या प्रमाणात विषारी ताडीची निर्मिती होते. विषारी ताडीविरोधात ‘डीएसपीं’कडे तब्बल चाळीस वेळा तक्रार केली. पाच वेळा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. गांधी जयंतीदिनी ताडी गुत्त्यावर बहिष्कार टाकला, तरी घरगुती ताडी विक्री केंद्रे सुरू आहेत. आम्ही ज्यावेळी पोलिसांकडे तक्रार करतो, फक्त त्याच वेळी कारवाई होते. इतर वेळेला पुन्हा पोलिसांच्या वरदहस्ताने ताडी विक्री जोरात चालते. यात शंभर टक्के पोलीस यंत्रणेचा सहभाग आहे. पोलिसांना हप्ते जातात. विषारी ताडीविरोधात पुन्हा आम्ही जनआंदोलन छेडणार आहोत.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी