ही महिला बिकिनीतच करतेय विमानातून प्रवास, सेलिब्रिटींपेक्षाही हिच्याच एअरपोर्ट लुकची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 17:38 IST2021-09-05T12:51:39+5:302021-09-06T17:38:31+5:30
सध्या एका महिलेचा एअरपोर्ट लुक (airport look) चांगलाच चर्चेत आला आहे. ही महिला चक्क बिकीनी घालुन एअरपोर्टवर (airport) आलीये. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होतोय.

ही महिला बिकिनीतच करतेय विमानातून प्रवास, सेलिब्रिटींपेक्षाही हिच्याच एअरपोर्ट लुकची चर्चा
बड्या सेलिब्रिटींचे एअरपोर्टवरील फोटो किंवा व्हिडीओ सोशल मिडियावर (social media) नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. अभिनेता, अभिनेत्री यांचे फोटो इन्स्टाग्राम, फेसबुक अशा माध्यमांवर आवडीने शेअर केले जातात. मात्र सध्या एका महिलेचा एअरपोर्ट लुक (airport look) चांगलाच चर्चेत आला आहे. ही महिला चक्क बिकीनी घालुन एअरपोर्टवर (airport) आलीये. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होतोय.
हा व्हिडीओ पाहताच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. व्हिडीओमध्ये ही महिला बिकिनीतच एअरपोर्टवर आली आहे. खांद्यावर बॅग आणि हातात पर्स घेऊन ही महिला बहुदा बिकिनीतच विमानाने प्रवास करणार आहे. कोरोनाकाळातील नियम म्हणून या महिलेनं तोंडाला मास्कही लावला आहे. मात्र तिचा हा एकंदर अवतार पाहुन सर्वांच्या नजरा तिच्याकडेच वळल्या आहेत.
सध्या या महिलेचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. नेटकऱ्यांनी तर यावर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. तोंडाला मास्क लावून महिला बिकिनीवर आल्यामुळेदेखील नेटकऱ्यांनी अनेक मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा इन्स्टाग्रामवर humansofspiritairlines या पेजवर अपलोड करण्यात आला आहे.