हाय हिल्स घालून ती धाव धाव धावली; कधीही पाहिला नसेल असा स्टंट, व्हिडीओ झाला तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2021 01:12 PM2021-02-21T13:12:44+5:302021-02-21T13:29:54+5:30

Viral News in Marathi : सोशल मीडियावर व्हायरल होणार्‍या एका महिलेच्या या व्हिडिओने सर्वांनाच चकित केले आहे. कारण ती वेगाने पळत आहे.

Woman runs in high heels people said the power she has see viral video | हाय हिल्स घालून ती धाव धाव धावली; कधीही पाहिला नसेल असा स्टंट, व्हिडीओ झाला तुफान व्हायरल

हाय हिल्स घालून ती धाव धाव धावली; कधीही पाहिला नसेल असा स्टंट, व्हिडीओ झाला तुफान व्हायरल

Next

हाय  हिल्समुळे फक्त मुलींचा लूक चांगला दिसत नाही तर पर्सनॅलिटीसुद्धा उत्तम  दिसते. उंच, टोकदार हिल्सच्या सॅण्डल घालून मुली फारच स्टाईलनं चालतात पण हाय हिल्सवर रेस लावली तर काय होईल याचा विचार तुम्ही कधी केलाही नसेल. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांची झोपच उडाली आहे. कारण ही मुलगी चक्क हाय हिल्सच्या सॅण्डल घालून धावत आहे.  
सोशल मीडियावर व्हायरल होणार्‍या एका महिलेच्या या व्हिडिओने सर्वांनाच चकित केले आहे. कारण ती वेगाने पळत आहे.

काँक्रीट-खडकाळ रस्त्यावर उंच टाचांवर चालणाऱ्या या महिलेचा व्हिडिओ लोकांमध्ये लोकप्रिय झाला आहे. लोक सोशल मीडियावर या व्हिडिओचा खूप आनंद घेत आहेत. आतापर्यंत ६ लाख वेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे. लोकही आपले व्हिडिओ  सोशल मीडियावर शेअर करत आहेत आणि त्यावर त्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. Petrol price hike Video : बाबो! या जोडप्याला लग्नात गिफ्ट मिळालं पेट्रोल, कांदा अन् सिलेंडर; व्हायरल व्हिडीओ पाहून लोक म्हणाले....

बर्‍याच लोकांनी त्या महिलेस प्रोत्साहित केले, तर काही लोक असे होते ज्यांनी उंच टाच घालून धावण्याचे दुष्परिणाम देखील सांगितले. काही लोक असे म्हणाले की,  अनेकजण चप्पल आणि शूजमध्ये योग्यरित्या चालू शकत नाहीत, ही महिला टाचांची सॅण्डल  घालून धावत आहे.   CoronaVirus News : धोका वाढला! राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; हादरवणारी आकडेवारी आली समोर

Web Title: Woman runs in high heels people said the power she has see viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.