CoronaVirus News : धोका वाढला! राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; हादरवणारी आकडेवारी आली समोर

By Manali.bagul | Published: February 21, 2021 11:04 AM2021-02-21T11:04:01+5:302021-02-21T11:19:37+5:30

CoronaVirus News & Latest Updates : केंद्रीय आरोग्य खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी देशात जवळपास २२ दिवसांनी कोरोना रुग्णांची इतकी जास्त संख्या आढळून आली आहे.

CoronaVirus News : Highest corona cases after twenty two days in india on saturday | CoronaVirus News : धोका वाढला! राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; हादरवणारी आकडेवारी आली समोर

CoronaVirus News : धोका वाढला! राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; हादरवणारी आकडेवारी आली समोर

googlenewsNext

कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. महाराष्ट्र, केरळ, पंजाब, छत्तीसगड, मध्यप्रदेश या राज्यात कोरोनाचा प्रसार वेगाने होताना दिसून येत आहे.  लसीकरणानंतर लोकांमध्ये स्थिरतेचं वातावरण तयार झालं होतं पण आता देशातील वेगवेगळ्या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना लोकांच्या काळजीत भर पडली आहे.  केंद्रीय आरोग्य खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी देशात जवळपास २२ दिवसांनी कोरोना रुग्णांची इतकी जास्त संख्या आढळून आली आहे.

शनिवारी देशात १३  हजार ९९३ म्हणजेच जवळपास १४  हजार रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. याआधी २९ जानेवारीला १८ हजार ८५५ रुग्ण आढळून आले होते.  त्यामुळे कालची आकडेवारी सर्वाधिक असलेली दिसून येत आहे.  सध्या सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात आढळून येत आहे. शनिवारी राज्यात ६ हजार २८१ नवे रुग्ण आढळले आहेत. मागील दहा दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत दुपटीनं वाढ झाली आहे.  याच पार्श्वभूमीवर प्रसार रोखण्यासाठी मुंबईत आतापर्यंत तेराशेपेक्षा अधिक इमारती सील केल्या आहेत.

५ रुग्ण आढळल्यास संबंधित इमारत सील करण्याचे आदेश मुंबई महापालिकेने दिले आहेत. कोरोनाबाधित रुग्ण आणि संशयित होम क्वारंटाईनमध्ये असतानाही बाहेर वावरताना आढळून आल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरातील इतर पाच राज्यांमध्ये आढळणारी रुग्णसंख्या पाहता केंद्रानंही चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे कोरोनाची ही साखळी खंडित करायची असल्यास नियमांचं  योग्य पद्धतीनं पालन गरजेचं असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. कोरोनाच्या समस्येला नष्ट करणं अधिक सोपं; भविष्यातील संकटांबाबत बिल गेट्स म्हणाले की....

देशामध्ये सध्या १०९७७३८७ कोरोना रुग्ण असून त्यातील १०६७८०४८  जण बरे झाले आहेत. शनिवारी कोरोनामुळे १०१ जण मरण पावले आहेत. देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या १४३१२७ आहे. देशातील कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या दीड लाखापेक्षा कमी असून त्यांचे प्रमाण १.२७ टक्के आहे.  या आजारातून १ कोटी ६ लाख ७८ हजार जण बरे झाले असून, त्यांचे प्रमाण ९७.२७ टक्के आहे. खुशखबर! रामदेव बाबांनी शोधला कोरोनाचा रामबाण उपाय; फक्त ३ दिवसात रुग्ण बरा होण्याचा दावा

Web Title: CoronaVirus News : Highest corona cases after twenty two days in india on saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.