Video : आईने मुलांसोबत केलेला प्रँक पाहून तुम्हीही म्हणाल; आई आहे की वैरीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 16:43 IST2019-10-22T16:42:53+5:302019-10-22T16:43:26+5:30
मुलं आई-वडिलांसोबत अनेकदा मस्ती करतात. लहानपण असतचं असं. गपचूप दरवाज्याच्या मागे उभे राहतात आणि आई आल्यानंतर अचानक ओरडून तिला घाबरवतात.

Video : आईने मुलांसोबत केलेला प्रँक पाहून तुम्हीही म्हणाल; आई आहे की वैरीण
मुलं आई-वडिलांसोबत अनेकदा मस्ती करतात. लहानपण असतचं असं. गपचूप दरवाज्याच्या मागे उभे राहतात आणि आई आल्यानंतर अचानक ओरडून तिला घाबरवतात. अशा अनेक गोष्टी ते करत असतात. पण एका व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एका आईनेच आपल्या मुलांसोबत असा काही प्रँक केला की, ते पाहून मुलं घाबरून ओरडूच लागली.
सर्वात आधी व्हिडीओ पाहा :
Renae Johnson ने आपल्या मुलांना घाबरवण्यासाठी जिभेमध्ये कैची घुसवली. थांबा... थांबा... घाबरून जाऊ नका. खऱ्याखुऱ्या जिभेमध्ये नाहीतर ती जिभ खोटी होती. एसं करून महिला जमिनीवर पडून राहिली. तेवढ्यात तिच्या मुलगा तिथे आला अन् पाहून आरडा-ओरडा करू लागला. त्यानंतर मुलगी आली आणि ते पाहून तिसुद्धा ओरडू लागली. मुलं घाबरलेली पाहून तिने खोटी जीभ काढून दाखवल्यावर कुठे मुलं शांत झाली.