शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
3
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
4
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
5
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
6
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
7
आयोग नव्हे, मतदारच राजा !
8
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
9
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
10
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
11
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
12
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
13
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
14
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
15
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
16
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
17
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
18
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
19
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
20
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)

...अन् कोरोना लस घेताच 'तो' ढसाढसा रडू लागला; 'हा' भन्नाट Video पाहून आवरणार नाही हसू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 10:20 IST

Viral video of young man who scared for corona vaccine : कोरोना लस घेताच एक तरुण ढसाढसा रडू लागल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत असून सध्या याच व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 3,22,85,857 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 35,178 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 440 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,32,519  लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान देशात लसीकरण मोहीम सुरू असून आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. मात्र याच दरम्यान अनेक जण लस घेण्यासाठी घाबरत आहेत. लसीबाबत अनेक गैरसमज किंवा भीती असल्याने ते लस घेणं टाळत आहेत. लसीकरणाचे अनेक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत. 

कोरोना लस घेताच एक तरुण ढसाढसा रडू लागल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत असून सध्या याच व्हिडीओची चर्चा रंगली आहे. हा मजेशीर व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. एक तरुण कोरोनाची लस घेण्यासाठी आला. लस घेण्याआधी प्रचंड घाबरला आहे. डॉक्टर त्याला लस देण्याचा प्रयत्न करतात मात्र हा तरुण ज्या पद्धतीनं ड्रामा करतो ते पाहून समजतं की तो आधीपासूनच घाबरलेला आहे. डॉक्टरांनी त्याला लस देताच तो जोरजोराने ओरडू लागतो. त्याला ओरडताना पाहून आजूबाजूचे सर्वच लोक आणि डॉक्टर हसत अस्लयाचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. 

सोशल मीडियावर या तरुणाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. लोक हा व्हिडिओ एकमेकांसोबत शेअर करण्याबरोबरच यावर भन्नाट कमेंटही करत आहेत. एका यूजरने याला ओव्हर एक्टिंग म्हटलं आहे तर दुसऱ्या एकाने 'इसे कहते हैं फोबिया' असं म्हटलं आहे. हा मजेशीर व्हिडिओ फेसबुकवर विवेक कुमार नावाच्या यूजरने शेअर केला आहे. हजारो लोकांनी तो लाईक केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. लोकांची लसीकरणाबाबतची भीती दूर करण्याच्या नादात भाजपा आमदाराने एक अजब विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

कोरोना लसीमुळे नपुंसकता?; लोकांची भीती दूर करण्याच्या नादात भाजपा आमदाराचं अजब विधान, म्हणाले...

कोरोना लसीवर (Corona Vaccine) पसरलेल्या अफवांच्या दरम्यानच मध्य प्रदेशातील कटनीच्या विजयराघवगडचे भाजपाचे आमदार आणि माजी मंत्री संजय पाठक (Sanjay Pathak) यांनी एक विधान केलं असून सर्वच जण हैराण झाले आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने एका कार्यक्रमात ते म्हणाले, 'अनेक मूर्ख लोक अफवा पसरवत आहेत की कोरोना लस नपुंसकत्व आणेल, पण असे काहीही घडत नाही. मी देखील लस घेतल्यानंतर टेन्शनमध्ये होतो आणि त्यानंतर 3-4 महिन्यांनी स्वत: ची तपासणी केली असता काहीच झालेलं नसल्याचं दिसून आलं आहे.'

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतSocial Viralसोशल व्हायरल