Viral Video: घरात शिरण्याचा मार्ग चुकला, चोरीचा प्लॅन फसला; चोरासोबत बघा काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 12:57 IST2026-01-06T12:55:47+5:302026-01-06T12:57:26+5:30
राजस्थानातील कोटामध्ये चोरी करायला गेलेल्या चोरासोबत असं काही घडलं की पुन्हा चोरीचा विचार त्याच्या मनात येणार नाही. व्हिडीओ बघा म्हणजे नक्की काय झालं, हे तुम्हाला कळेल.

Viral Video: घरात शिरण्याचा मार्ग चुकला, चोरीचा प्लॅन फसला; चोरासोबत बघा काय घडलं?
नशिबाची साथ नसेल, तर प्लॅन किती चांगला असला तरी फसतोच. एका चोरासोबतही तेच झालं. त्याने चोरी करण्याचा प्लॅन बनवला. घरात कुठून शिरायच तेही ठरवलं, पण प्रत्यक्षात घरात शिरायला गेला तेव्हा वेगळंच घडलं. एक्झॉस्ट फॅनसाठीच्या जागेतून घरात शिरतानाच तो अडकला आणि त्यानंतर नाट्यमय प्रकार घडला. हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये शूट केला गेला.
राजस्थानातील कोटा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. सुभाष कुमार रावत यांच्या घरात चोरी करण्यासाठी आरोपी घुसणार होता. पण, तो एक्झॉस्ट फॅनच्या जागेतच अडकला.
एक्झॉस्ट फॅनच्या जागेत अडकला चोर, व्हिडीओ बघा
सुभाष कुमार रावत हे त्यांच्या पत्नीसोबत ३ जानेवारी रोजी खाटूश्यामजी दर्शनासाठी गेले होते. ४ जानेवारी रोजी रात्री ते परत आले. दरवाजा उघडल्यानंतर त्यांना स्वयंपाक घरात असलेल्या एक्झॉस्ट फॅनच्या जागेत व्यक्ती अडकलेला दिसला.
अडकलेल्या व्यक्तीला बघून ते घाबरले. त्यांनी आरडाओरड करण्यास सुरूवात केली. त्यांचा आवाज ऐकून शेजारी त्यांच्या घरी आले. त्यावेळी चोरासोबत असलेला त्याचा साथीदार पळून गेला. एक्झॉस्ट फॅनच्या जागेत अडकलेल्या चोराने घरमालक आणि तिथे जमा झालेल्या लोकांना धमक्या द्यायला सुरुवात केली.
A theft did was foiled after the thief got stuck in the exhaust vent of the house he was trying to enter in Kota district of Rajasthan. Later, owner alerted cops who arrived and rescued him. pic.twitter.com/SQnpIrXP3s
— Piyush Rai (@Benarasiyaa) January 6, 2026
मला जाऊ द्या. माझे अनेक साथीदार या परिसरात आहे. तुम्हाला सोडणार नाही, असे तो म्हणत होता. लोकांनी लगेच पोलिसांना कॉल केला आणि याची माहिती दिली.
बोरखेडा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी लगेच तिथे आले. त्यांनी बराच वेळ प्रयत्न करून चोराला एक्झॉस्ट फॅनच्या जागेतून बाहेर काढले आणि त्याला अटक केली. पोलीस सध्या त्याची चौकशी करत आहे. चोर त्याच्या साथीदारासह ज्या कारमधून आला होता. त्या कारवर पोलीस असल्याचे स्टिकर लावलेले होते. ती कारही पोलिसांनी जप्त केली आहे.