Video: ‘वो स्त्री है...’ कचरा फेकण्यासाठी महिलेने चक्क डिलिव्हरी बॉयला बोलावलं; व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 19:00 IST2026-02-04T18:55:31+5:302026-02-04T19:00:41+5:30
Viral Video: डिलिव्हरी बॉयला काहीच कल्पना नाही; बॉक्स उघडताच निघाला कचरा...

Video: ‘वो स्त्री है...’ कचरा फेकण्यासाठी महिलेने चक्क डिलिव्हरी बॉयला बोलावलं; व्हिडिओ व्हायरल
Viral Video: तुम्ही स्विगी, झोमॅटो, ब्लिंकइटसारख्या अॅप्सबद्दल ऐकले किंवा त्याचा वापर केला असेल. अशाच प्रकार पोर्टर नावाचे एक अॅप आहे, ज्याचा वापर एखादी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचवण्यासाठी केला जातो. डिलिव्हरी बॉय तुमच्या घरी येतात, पार्सल घेतात आणि इच्छित ठिकाणी पोहोचवतात. मात्र, अनेकदा याचा दुरुपयोगही केला जातो. अशाच प्रकारची घटना लखनौमधून समोर आली आहे.
नेमकं काय झालं?
लखनौला ‘नवाबांचे शहर’ म्हटले जाते. येथील लोकांची तहजीब, भाषा आणि वागणुकीत एक वेगळीच नजाकत असतेते. मात्र, या या नवाबीचा एक वेगळाच पैलू समोर आला आहे. ऑनलाइन डिलिव्हरी अॅप पोर्टरचा वापर करून एका महिलेने चक्क कचरा फेकण्यासाठी अॅपचा वापर केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुविधा मिळते म्हणून तिचा वापर कोणत्या थराला जाऊ शकतो, यावर या घटनेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
पार्सल बुकिंग…आत निघाला कचरा
व्हिडिओमध्ये दिसते की, एक महिला पोर्टर अॅपवरून पार्सल बुक करते. रायडर वेळेवर तिच्या घरी पोहोचतो. महिला पार्सल देताना ऑनलाइन पेमेंट झाले असल्याचे सांगते. सुरुवातीला सर्व काही नेहमीसारखेच वाटते. मात्र, रायडर जेव्हा पार्सल घेऊन लोकेशनवर पोहोचतो, तेव्हा तो नियमानुसार ग्राहकाला फोन करून विचारतो की, पार्सल कुणाला आणि कुठे द्यायचे आहे. त्यावर महिला म्हणते, भैया, पार्सल कुणालाच द्यायचे नाही, कचरा आहे फेकून द्या.
राइडरची प्रतिक्रिया; व्हिडिओत व्यक्त केली नाराजी
यानंतर तो रायडर पार्सल उघडून पाहतो, तर त्यात चक्क कचरा भरलेला होता. म्हणजेच, महिलेने जाणीवपूर्वक अॅपचा वापर केवळ कचरा दूर फेकण्यासाठी केला होता. या संपूर्ण घटनेचे रेकॉर्डिंग पोर्टर रायडरने केले असून, सोशल मीडियावर शेअर केले आहे. दरम्यान, व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर प्रतिक्रिया येऊ लागल्या. अनेकांनी महिलेच्या वागणुकीवर तीव्र टीका केली, तर काहींनी डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या कामाच्या परिस्थितीवर भाष्य केले.