Video: रशियन तरूणीचा व्हिडीओ सुरू असताना भर बाजारात मागे लागला तरूण, अन् पुढे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 18:46 IST2023-10-23T18:46:01+5:302023-10-23T18:46:40+5:30
तरूणीने अनेक वेळा समजावले की तिला मैत्री करायची नाही, पण मुलगा ऐकतच नव्हता

Video: रशियन तरूणीचा व्हिडीओ सुरू असताना भर बाजारात मागे लागला तरूण, अन् पुढे...
Russian Youtuber Viral Video: एक रशियन यूट्यूबर भारतात आली असताना एका मार्केटमधला तिचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ती तिच्या फॉलोअर्स आणि चाहत्यांसाठी दिल्लीच्या मार्केट रोडवर व्हिडीओ ब्लॉग (Vlog) शूट करत होती. या दरम्यान मागून एक तरूण आला आणि तिच्याशी मैत्री करण्याची इच्छा व्यक्त केली. तरूणीने त्याला अनेक वेळा समजावले की तिला मैत्री करायची नाही. पण मुलगा ऐकतच नव्हता. रशियन लोकांशी मैत्री करणे हे त्याचे स्वप्न आहे, असेही तो एकदा म्हणाला. त्यावर, तरूणीने त्याला भारतीयांशी मैत्री करण्याचा सल्ला दिला. त्यावेळी भारतीय मित्र-मैत्रिणींचा मला कंटाळा आल्याचे त्याने म्हटले. तसेच शेवटी तो तरूणीला 'सेक्सी' म्हणाला. त्यानंतर तरूणीने काय केले, पुढे काय घडले पाहा...
- व्हायरल क्लिपमध्ये, एक रशियन यूट्यूबर दिल्लीच्या सरोजिनी मार्केटमध्ये ब्लॉग बनवताना दिसून आली.
असा घडला संवाद-
मुलगा- हॅलो, तू माझी मित्र बनशील का? मला तुझ्याशी फ्रेंडशिप करायचीय
यू-ट्युबर तरूणी (हिंदीत)- सॉरी, मला मैत्री करायची नाही
मुलगा- मैत्रीतूनच ओळख होईल. मी तुमचे यू-ट्युब चॅनल खूप पाहतो
यू-ट्युबर तरूणी- धन्यवाद
मुलगा- मला तुझ्याशी मैत्री करायची आहे
यू-ट्युबर तरूणी- नको. मला पुरेसे मित्र आहेत
मुलगा- आणखी मित्र बनवले तर काय होईल? नवे मित्र बनवावेत
यू-ट्युबर तरूणी- नको
मुलगा- रशियन लोकांना मित्र बनवण्याचं माझं स्वप्न आहे
यू-ट्युबर तरूणी- तुम्ही भारतीयांना मित्र बनवा
मुलगा- मला भारतीय मित्रांचा कंटाळा आलाय. तू खूप सेक्सी आहेस
त्याचे हे वाक्य ऐकल्यावर मात्र, त्या मुलीने तेथून कसातरी पळ काढला.
हा व्हिडिओ 16 ऑक्टोबर रोजी @koko_kvv या Instagram पेजवरून पोस्ट करण्यात आला होता. हे रील नंतर खूप व्हायरल झाले. तब्बल 10 हजारांहून अधिक युजर्सनी त्यावर कमेंट केल्या.