Video: Cute punganuru baby cow playing around with its owner adorable video goes viral on social media | Cute baby cow video: 'त्या'ने घरातच पाळली बुटकी गाय, दिवसाला देते ५ लीटर दूध, दिसायला आहे इतकी सुंदर की...

Cute baby cow video: 'त्या'ने घरातच पाळली बुटकी गाय, दिवसाला देते ५ लीटर दूध, दिसायला आहे इतकी सुंदर की...

प्राण्याचे वेगवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. कुत्र्यांच्या खेळण्याचे, मांजरींच्या पिल्लाच्या मस्तीचे तसंच हत्तीचे विनोदी खेळकर व्हिडीओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असे व्हिडीओ पाहून नेहमीच चेहऱ्यावर हसू येते. दरम्यान सोशल मीडियावर एका गाईचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अश्या गाईचा व्हिडीओ याआधी तुम्ही कधीही पाहिला नसेल. हा व्हिडीओ  (Viral Video)  पाहून तुम्ही चकीत व्हाल. 

या व्हिडीओमध्ये गाईचं वासरू (Punganuru Baby Cow)  आपल्या मालकासह खेळताना दिसून येत आहे. ५० सेंकंदाच्या या व्हिडीओमध्ये गाईला समोर उपस्थित असलेली माणसं प्रेमानं गोंजारत आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता ही गाय आजूबाजूला फिरत आहे. गाईचं वासरू जसजसं फिरत राहतं त्याचप्रमाणे गळ्यातील घंटासुद्धा वाजतो.  तुम्हीसुद्धा व्हिडीओ पाहताना या गाईच्या प्रेमात पडाल. कारण छोटेसे, गिरागस गाईचे वासरू सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. "Sorry Love, मी तुझं जेवण खाल्लं", Uber Eats च्या डिलिव्हरी बॉयने स्वत:च संपवली ऑर्डर अन्... 

ट्विटरवर सोशल मीडिया युजरनं दिलेल्या माहितीनुसार एका या गाईच्या वासराचे नाव पुंगनुरू आहे. गाईची ही प्रजात नामशेष होण्याच्या  मार्गावर आहे. या गाईची उंची ३-४  फूट असून वजन १५० चे २०० किलोग्राम आहे. ही गाय रोज  ४ ते ५ लीटर  हाय फॅट दूधसुद्धा देते. आतापर्यंत ७ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून ३८ हजारांपेक्षा जास्त लाईक्स या  व्हिडीओला मिळाले आहेत. हजारो लोकांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या फोटोतील हातांची संख्या आहे तरी किती? पाहताच क्षणी लोक गोंधळात पडले, बघा तुम्हाला जमतंय का


 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Video: Cute punganuru baby cow playing around with its owner adorable video goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.