Video: Child was sleeping while eating food took rice in his hand and fell on the ground see funny video | Video : जेवता जेवताच चिमुरड्याला आली डुलकी; हातात भाताचा घास घेतला अन् पुढे झालं असं काही.....

Video : जेवता जेवताच चिमुरड्याला आली डुलकी; हातात भाताचा घास घेतला अन् पुढे झालं असं काही.....

सोशल मीडियावर एका चिमुरड्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही लोट पोट होऊन नक्कीच हसाल तसंच तुमचं बालपण नक्की आठवेल. यात एक चिमुरडा जेवताना दिसून येत आहे. जेवता जेवता त्याला झोप येते आणि तो अशी काही रिएक्शन देतो. जी पाहून नेटिझन्सना हसू अनावर झालं आहे. या व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ @ganeshnain नावाच्या सोशल मीडिया युजरनं शेअर केला आहे. व्हिडिओ सोबत असलेले कॅप्शन तुम्ही पाहू शकता, 'जेव्हा मी खाताना झोपत होतो तेव्हा लहानपण होते का?' व्हिडिओ खूप मजेदार आहे. या व्हिडिओमध्ये आपण स्वत: पाहू शकता की एखादा मुलगा हातात प्लेट घेऊन बसलेला आहे आणि खात आहे, परंतु हळूहळू त्याला झोप यायला लागते आणि त्याचे डोळे बंद होतात. दरम्यान, झोपेमुळे हातात भात घेताच तो अचानक जमिनीवर पडला आणि झोपी गेला. बाबो! परिक्षेत अशा प्रकारे चिंटिंग करतात विद्यार्थी; व्हायरल झाल्या गमतीदार कॉपी करण्याच्या ट्रीक्स

लोकांनी या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत १  हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून अनेकांनी या कमेंट्स केल्या आहेत.लोकांना व्हिडीओ पाहून आपल्या लहापणाच्या दिवसांची आठवण आली आहे. ५०० वर्ष जुन्या दुर्मीळ वस्तूचा लिलाव, २५०० चा कटोरा ३ कोटींमध्ये विकला जाणार!
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Video: Child was sleeping while eating food took rice in his hand and fell on the ground see funny video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.