बाबो! परिक्षेत अशा प्रकारे चिंटिंग करतात विद्यार्थी; व्हायरल झाल्या गमतीदार कॉपी करण्याच्या ट्रीक्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 06:21 PM2021-03-03T18:21:44+5:302021-03-03T18:59:28+5:30

Hilarious viral methods of cheating students : कोरोनामळे गेल्या एकावर्षापासून मुलांच्या शाळा, कॉलेजेस पूर्णपणे बंद होते. अशात आता परिक्षा सुरू होणार म्हटल्यावर मुलांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

भारतात लवकरच दहावी आणि बारावीच्या परिक्षांना सुरूवात होणार आहे. कोरोनामळे गेल्या एकावर्षापासून मुलांच्या शाळा, कॉलेजेस पूर्णपणे बंद होते. अशात आता परिक्षा सुरू होणार म्हटल्यावर मुलांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

काही ठिकाणी परिक्षा आली की मुलं अभ्यास करायचं सोडून कॉपी करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधू लागतात.

सध्या सोशल मीडियावर असेच काही फोटो व्हायरल होत आहे. असे फोटो तुम्ही याआधी कधीही पाहिले नसतील.

यानं तर हद्दच केली. कॅल्यूलेटर मशीनमध्ये मोबाईल फोन लपवलाय

अशी स्टाईल तुम्ही याआधी कधीही पाहिली नसेल. फूल हातांच्या शर्टाचा पुरेपूर वापर करून घेतलाय कॉपी साठी

पेनसुद्धा सोडलं नाही. छोट्याश्या पेनानंही कॉपी करताहेत.