video: विटांनी भरलेली बोट अन् जहाजाचा अपघात; एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 02:02 PM2024-02-11T14:02:23+5:302024-02-11T14:02:40+5:30

सोशल मीडियावर हा भीषण व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

video: Brick boat and shipwreck accident, video goes viral | video: विटांनी भरलेली बोट अन् जहाजाचा अपघात; एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं...

video: विटांनी भरलेली बोट अन् जहाजाचा अपघात; एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं...

Social Media Viral Video: तुम्हाला माहीत असेल की, देशभरात लहान-मोठ्या नद्यांमधून वाळू काढून ती बोटीद्वारे ट्रक आणि ट्रॅक्टरमध्ये भरली जाते. मात्र, अनेक ठिकाणी वाळू वाहून नेणाऱ्या बोटींचा विटा वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यासाठीही केला जातो. यासंबंधीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात विटांनी भरलेली बोट आणि एका मोठ्या जहाजाचा अपघात झालेल्या दिसतोय.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, विटांनी भरलेली बोट नदीतून जात आहे, यावेळी अचानक ही बोट एका मोठ्या जहाजाला धडकते. यामुळे त्या मोठ्या जहाजाला इजा होत नाही, पण बोटीचा पुढचा भाग तुटतो आणि बोट वेगाने पाण्यात बुडू लागते. धक्कादायक बाब म्हणजे, या बोटीत अनेक लोक होते, जे बोटीसह पाण्यात बुडायला लागतात. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, याची माहितीही मिळू शकली नाही.

@crazyclipsonly नावाच्या आयडीवरुन हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 16 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 10 मिलियन वेळा पाहिला गेला आहे, तर हजारो लोकांनी या व्हिडिओला लाईक देखील केले आहे. या व्हिडिओवर युजर विविध प्रतिक्रियाही देत आहेत.

Web Title: video: Brick boat and shipwreck accident, video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.