मनोरंजन ठरलं जीवघेणं! गारुड्याचा खेळ बघताना व्यक्तीच्या पँटमध्ये घुसला कोब्रा साप आणि....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 16:01 IST2026-05-01T15:59:51+5:302026-05-01T16:01:02+5:30

Viral News : गारुड्याच्या खेळादरम्यान एक कोब्रा साप त्याच्या पँटमध्ये शिरला आणि त्याने पायांवर दंश केला. ज्यामुळे लगेच व्यक्तीचा मृत्यू झाला.

Tourist died after cobra crawled into pants during snake show | मनोरंजन ठरलं जीवघेणं! गारुड्याचा खेळ बघताना व्यक्तीच्या पँटमध्ये घुसला कोब्रा साप आणि....

मनोरंजन ठरलं जीवघेणं! गारुड्याचा खेळ बघताना व्यक्तीच्या पँटमध्ये घुसला कोब्रा साप आणि....

Viral News : कुणासोबत काय, कधी आणि कसं घडेल याचा काहीच नेम नसतो. म्हणजे कुठे फिरायला गेले असाल किंवा मनोरंजनासाठी काही बघत असाल तेव्हाही अचानक काहीही धक्कादायक घडू शकतं. आता हेच बघा ना...जर्मनीतील एका ५७ वर्षीय व्यक्तीसोबत असंच झालं. ही व्यक्ती आपल्या परिवारासोबत इजिप्तच्या प्रसिद्ध रेड सी रिसॉर्ट हुरघाडाला फिरायला गेली होती. येथील हॉटेलमध्ये गारुड्याचा खेळ बघताना या व्यक्तीसोबत फारच भयानक घटना घडली. शोदरम्यान एक कोब्रा साप त्याच्या पँटमध्ये शिरला आणि त्याने पायांवर दंश केला. ज्यामुळे लगेच व्यक्तीचा मृत्यू झाला. 

पँटमध्ये सोडला साप आणि...

बवेरिअन पोलिसांनुसार, परिवारातील ३ सदस्य हुरघाडाच्या एका लक्झरी रिसॉर्टमध्ये थांबले होते. हॉटेलच्या मनोरंजन कार्यक्रमात साप चर्मर म्हणजे सापाचे खेळ दाखवणाऱ्या गारुड्याचा खेळ सुरू होता. यात दोन कोब्रा सापांना प्रेक्षकांच्या गळ्यात आणि खांद्यांवर टाकले जात होते. दरम्यान गारुड्याने एक कोब्रा ५७ वर्षीय व्यक्तीच्या पँटमध्ये जाऊ दिला. सापाने आत गेल्याबरोबर व्यक्तीच्या पायावर दंश केला. काही वेळातच विषाची लक्षणं व्यक्तीमध्ये दिसू लागली. व्यक्तीला लगेच दवाखान्यात नेण्यात आलं. पण काही फायदा झाला नाही. पोलिसांनी सांगितलं की, खेळादरम्यान गारुड्याने मुद्दामहून साप प्रेक्षकाच्या पँटमध्ये टाकला होता.

गारुड्याचा खेळ ठरला जीवघेणा

हुरघाडा इजिप्टमधील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. येथील लक्झरी रिसॉर्ट्स, बीच आणि पाण्याच्या खेळासाठी पर्यटक इथे येतात. गारुड्याचा खेळ अनेक हॉटेलच्या मनोरंजनाचा भाग असतो. पण यावेळी मनोरंजन जीवघेणं ठरतं. एक्सपर्ट सांगतात की, कोब्रा सापाचं विष फार खतरनाक असतं. जर वेळीच अँटी-वेनम दिलं गेलं नाही तर जीव जाऊ शकतो. या व्यक्तीवर लगेच उपचार झाले नाही, त्यामुळे विष वेगाने पसरलं.

इजिप्तमध्ये सापाने दंश केल्याच्या अनेक घटना नेहमीच समोर येत असतात. पण इथे हॉटेलमधील शो दरम्यान ही पहिली मोठी दुर्घटना घडली. ही घटना पर्यटकांसाठी इशारा आहे. परदेशात फिरायला जाताना लोकल शो किंवा अॅक्टिविटीमध्ये सहभागी होत असताना सुरक्षेची आधी काळजी घेतली पाहिजे. आशा आहे की, इजिप्त सरकार घटनेची चौकशी करेल आणि भविष्यात अशा शोबाबत कठोर गाइडलाईन जारी करेल. 

Web Title : सांप के खेल में कोबरा आदमी के पैंट में घुसा, मौत!

Web Summary : मिस्र में एक होटल शो के दौरान कोबरा सांप एक जर्मन पर्यटक के पैंट में घुस गया, जिससे उसकी मौत हो गई। सांप को जानबूझकर अंदर डाला गया था। तुरंत इलाज के बावजूद, जहर फैल गया। विशेषज्ञों ने कोबरा के जहर के खतरे से आगाह किया है।

Web Title : Cobra sneaks into man's pants during show, proving fatal.

Web Summary : A German tourist in Egypt died after a cobra, part of a hotel show, bit him. The snake was deliberately put in his pants. Despite immediate medical attention, the venom spread quickly. Experts warn of cobra venom's danger and urge caution during foreign travel activities.