CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम

Suryakumar Yadav Kieron Pollard IPL 2026 CSK vs MI: सूर्यकुमार यादवने १२ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकारासह ठोकल्या २१ धावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 16:12 IST2026-05-03T16:07:29+5:302026-05-03T16:12:19+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Suryakumar Yadav surpasses Kieron Pollard becomes Mumbai Indians 2nd highest run-scorer ipl 2026 csk vs mi | CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम

CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम

Suryakumar Yadav Kieron Pollard IPL 2026 CSK vs MI: मुंबई इंडियन्ससाठी सातत्याने धावांचा पाऊस पाडणारा सूर्यकुमार यादव यंदाच्या हंगामात फारसा चमकू शकला नाही. आतापर्यंत झालेल्या ९ सामन्यांत सूर्यकुमारच्या बॅटमधून एकही दमदार खेळी आलेली नाही. पण असे असूनही सूर्यकुमार यादवच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. आयपीएल २०२६ मधील चेन्नईविरूद्धच्या २१ धावांच्या खेळीच्या जोरावर सूर्याने एक मोठी झेप घेतली आहे.

सूर्यकुमार यादवने किरॉन पोलार्डला टाकलं मागे

मुंबई इंडियन्सचा 'फिनिशर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किरॉन पोलार्डने मुंबई इंडियन्स संघासाठी ३,९१५ धावा केल्या होत्या. सूर्यकुमारने आता हा टप्पा ओलांडला आहे. तो मुंबईसाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. या यादीत मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा अजूनही अव्वलस्थानी आहे. रोहितच्या नावावर मुंबईसाठी ५००० हून अधिक धावांची नोंद आहे. सूर्या आता रोहितच्या विक्रमाचा पाठलाग करत आहे.

कमी डावांमध्ये केला मोठा पराक्रम

सूर्याने अत्यंत कमी डावांमध्ये धावा काढल्या आहेत. त्याची सरासरी आणि स्ट्राईक रेट पाहता, तो मुंबई इंडियन्सच्या इतिहासातील सर्वात प्रभावी फलंदाज असल्याचे सिद्ध होते. सूर्यकुमार यादवने ज्या वेगाने या धावा केल्या आहेत, ते पाहता आगामी काळात तो रोहित शर्माच्या विक्रमालाही आव्हान देऊ शकतो. पण या चालू हंगामातही सूर्याला आपल्या फलंदाजीने फारसा प्रभाव पाडता आलेला नाही.

Web Title : कम स्कोर के बावजूद, सूर्यकुमार यादव ने पोलार्ड का रिकॉर्ड तोड़ा।

Web Summary : सूर्यकुमार यादव, आईपीएल सीज़न में शांत रहने के बावजूद, मुंबई इंडियंस के लिए कीरोन पोलार्ड के रन रिकॉर्ड को पार कर गए। वह अब रोहित शर्मा के बाद एमआई के लिए दूसरे सबसे ज्यादा रन बनाने वाले खिलाड़ी हैं, कम पारियों में उपलब्धि हासिल कर अपनी प्रभावशाली बल्लेबाजी का प्रदर्शन किया।

Web Title : Despite modest score, Suryakumar Yadav surpasses Pollard's Mumbai Indians record.

Web Summary : Suryakumar Yadav, despite a quiet IPL season, surpassed Kieron Pollard's run record for Mumbai Indians. He is now second-highest scorer for MI, behind Rohit Sharma, achieving feat in fewer innings, showcasing his impactful batting.